नवीन लेखन...

माझी ऊर्जा

कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते. […]

इंदू वंदन

घरची स्त्रीच घराला घरपण देत असते… आज्जीच्या प्रसन्न स्वभावाने कोकणातलं घरही सदैव समाधानाच्या सरींत भिजत राहिलं… पैशांची श्रीमंती असली म्हणजेच माणूस मणभर सुखी होतं नसतो… जे मिळालं आहे त्यात संतुष्टता आणि समाधान मानलं तरच मन भर सुख त्याला मिळतं… […]

वृद्धत्व : सत्य की काल्पनिक!

वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही. […]

पंचामृत महात्म्य

पंचामृत स्नानं समर्पयामि ’गणपतीची पूजा असो सत्यनारायणाची पूजा असो की त्या षोडषोपचार पूजेत पंचामृताचा वापर असतोच असतो. देवाला नैवेद्य म्हणून आपण पाच फळे ठेवतो. व पूजेनंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो. पण या सगळ्याच्या मागे आपल्या शास्त्राचा इतका सखोल विचार व अभ्यास दडला आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. […]

ज्येष्ठ हो तुमच्यासाठी

विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. […]

आठवणींची मालिका

वय वाढत जातं तसं एकेक जवळच माणूस दुरावतो. वर्षानुवर्षे असलेली साथसंगत हरवते. एकटेपण कधी मनाला बोचते. तर कधी काहीशा गमतीदार प्रसंगानाही सामोरे जावे लागते. अशाच काही भावनाशील, प्रेमळ अनुभवांचा कोलाज! […]

शहाणं बाळ

शहरीकरणानंतर घरातल्या दोघांनी काम करणं आवश्यक झालं, मग त्यातून शहरातल्या लहान जागेमुळे आजी आजोबा गावी आणि मुलं शहरात. कुटुंब लहान होत गेली, त्यातून मुलांवर संस्कार करणारी पिढीच नामशेष होऊ लागली. त्यामुळे मुलंही त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेऊ लागली आणि नको त्या संगतीत रमू लागली तेव्हा कुठेतरी सहिष्णुतेचे गणित बिघडू लागलं आणि मग अरेरावी, मुर्दाडपणा, फक्त मी आणि मी ही भावना वाढू लागली. […]

भाग्यवती

गुणी, समंजस आणि कर्तुत्ववान-समाधानी पतीची साथ, हे माझं सौभाग्य! सुसंस्कृत, कलासक्त माणसांनी भरलेला सासर परिवार, हे माझं सौभाग्य! उत्तम जाणकार आणि विवेकी मित्रपरिवार, हे माझं सौभाग्य! आस्वादक व चोखंदळ वाचक लाभणं हे माझं सौभाग्य!!!! म्हणून म्हणते आहे मी स्वतःला सौभाग्यवती!! तेव्हा कृपया ते सौ. लिहिलेलं खोडू नका!’ […]

मी पाहिलेली ऊर्जा

अखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे  काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला. […]

चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते. […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..