नवीन लेखन...

जमेल तेवढे तर करू!

वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाइलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे…’ अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा! […]

संस्कारांची जपणूक

रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव. […]

तेथे कर माझे जुळती

सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. […]

नातं जपताना

शेजारपाजारच्या माणसात मिसळण्याची त्यांच्या अडीअडचणीला मदत करण्याची देखील सवय लावून घेतली पाहिजे. पेराल तसं उगवतं या न्यायाने हीच माणसं पुढे जाऊन तुमच्या उपयोगी पडणार असतात. स्वत:ला कशात न कशात कायम बिझी ठेवलं पाहिजे आयुष्यातले दुःखाचे क्षण आठवण्यापेक्षा आनंदाचे क्षण आठवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. थोडक्यात येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करत स्ट्रेस न घेता नेहमी आनंदी राहता आलं पाहिजे. […]

वानप्रस्थाश्रमातील मूलभूत विचार

आतापर्यंत आपण पैसा, पैसा आणि पैसा हाच आपला सखा, मित्र, गणगोत समजत होतो. त्याऐवजी सखा भगवंत झाल्याने उद्वेग, चिंता, काळजी नष्ट होऊन त्याऐवजी आता मानसिक समाधानाची प्राप्ती आपल्याला होते आहे. त्यामुळे सर्व प्रापंचिक, भौतिक वस्तुंवरील आपली आसक्ती सहजपणे कमी होते आहे. हे आत्मपरीक्षण, त्यातून प्राप्त झालेली अनुभूती हीच आपल्याला जीवनाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे कृतकृत्यतेकडे घेऊन जाईल. […]

जगण्याला प्रयोजन हवे

एक मोठे ध्येय डोळ्यासमोर होते. त्या ध्येयाने मला जिवंत ठेवले. त्या ध्येयाने मला तेथील छळ सोसायला बळ दिले. ज्याला जीवनाचे ध्येय मिळाले आहे, तो कोणतेही आघात सोसू शकतो, कोणतीही संकटे झेलू शकतो आणि कोणतेही दिव्य पार करू शकतो. फक्त मनुष्याला ध्येय हवे.
जगण्याला प्रयोजन हवे.
[…]

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

‘ज्येष्ठ म्हणजेच श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्व असलेला प्रत्येक जण ज्येष्ठ’ असं मी मानते. आज अनेक वर्षे कला क्षेत्रात काम करीत असताना नव्या आणि जुन्या पिढीतील प्रत्येक कलाकारांकडून अनेक गोष्टी नकळतपणे शिकायला मिळतात. […]

आत्मनिर्भरता

परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे. […]

ऊर्जा येते तरी कुठून?

अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं. […]

भोजनशास्त्र

प्राचीन काळात भारतवर्षात पाकशास्त्रसुद्धा अत्यंत समृद्ध होते. अनेकविध शेकडोंच्या संख्येने असलेले पदार्थ, खाण्याच्या पद्धती व भोजनविधी यांनी प्राचीन पाकशास्त्र संपन्न आहे.  भोजन शुद्ध, स्वादिष्ट व हितकर होण्यासाठी ज्याप्रमाणे पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे लागते, तेवढेच महत्त्व भोजनासाठी उपयोगात आणल्या जाणार्या पात्रांबाबत (भांड्यांबाबत) सुद्धा लक्ष द्यावे लागते. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..