संगणकाची सवारी
आता प्रत्येक बँकरच्या तोंडी एक वाक्य कायम असतं म्यॅन्यूअल बँकिंगची मजाच वेगळी होती, कुणावर अवलंबून रहावे लागत नव्हते, कनेक्टिव्हिटी, रेंज, सॉफ्टवेअर अपडेशन, लॉग इन, असे कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. पूर्वीचे टेलर तर घरापासूनच काम सुरू करायचे, येता येता त्यांना कुणीतरी खात्यात पैसे भरायला द्यायचं, कुणी विड्रॉल द्यायचं, त्याला लगेच पैसे मिळायचे, बँकेत जाता जाता लोक सरकारी चलन भरायला द्यायचे, अशी कितीतरी कामं सुरळीत पार पडायची. […]