कोकण विकासाची संधी
आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे. […]