कोकण, नारळ आणि कोकम
कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच. […]