मराठीची महती
मराठी आणि मराठी भाषाभिमान हा विषय निघतो तेव्हा १९२२ साली पुण्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र शारदा मंदिराचे व तिथे येणाऱ्या साहित्यिक मित्रांनी स्थापन केलेल्या रवी किरण मंडळाचे सदस्य आणि मराठीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या माधव ज्युलियन याचे नाव प्रकर्षाने डोळ्यापुढे येते. नवीन पिढ्यांचा या नावाशी कितपत परिचय असेल कल्पना नाही. […]