जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र समजून घेतले.
जब प्यार किसी से होता है, हा त्यांनी १९६१ मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रचंड गाजला. त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. धंदेवाईक तडजोडीला नकार देणारे हुसेन यांनी पन्नास वर्षात मोजकेच चित्रपट काढले पण ते सर्व उत्कृष्ट होते. तिसरी मंझिल, या चित्रपटात शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातली गाणी बरीच वर्षे गाजत आहेत.
अनामिका, जखमी, प्यार का मौसम, जब प्यार किसी से होता है, जन्म जन्म का साथ, मदहोश, कारवॉं, तुम मेरे हो, दुल्हा बिकता है, लॉकेट, खून की पुकार, हे त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट देशभरातल्या चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी ठरले होते. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करताना प्रवाही कथेबरोबरच चित्रपटांची तंत्र शुध्दताही त्यांनी सांभाळली. अनेक नव्या कलाकारांना संधी देतानाच, तंत्रज्ञही घडवले. ही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीला देणगी होय! साध्या, सोप्या प्रेमकथेवरचा प्यार का मौसम हा चित्रपट तेव्हाच्या युवकांत अत्यंत लोकप्रिय झाला होता. अनामिका हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला होता.
चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान हा मा.ताहिर हुसेन यांचा मुलगा. त्यांच्या तालमीतच आमिर खान तयार झाला. ताहिर हुसेन हे लेखक आणि पटकथा लेखक होते. पटकथा लिहिताना ते भारतीय प्रेक्षकांची नाडी ओळखूनच संवाद लेखन करीत. तशीच गीतेही चित्रपटासाठी गीतकारांकडून लिहून घेत. सर्वांना माणुसकीने वागवणारा निर्माता आणि दिग्दर्शक असा त्यांचा चित्रपटसृष्टीत लौकिक होता. ताहिर हुसेन यांचे २ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ताहिर हुसेन यांचे चित्रपट
निर्माता- कारवाँ (1971), अनामिका (1973), मदहोश (1974), जख्मी (1975), फिर जनम लेंगे हम (1977), खून की पुकार (1978), दूल्हा बिकता है (1982), लॉकेट (1986), हमारा खानदान (1988), तुम मेरे हो (1990), हम हैं राही प्यार के (1993),
दिग्दर्शक – तुम मेरे हो (1990)
Leave a Reply