ताई माझी मोत्यांची माळ ग,
घाल तुझ्या गोऱ्यापान गळां ग, टपोरे पाणीदार छोटे मोती ग शोभतील तुझ्या कसे कंठी ग, ताई तू अशी सौंदर्यवती ग,
देखणी म्हणू, लावण्यवती ग,
सुकुमार तू जशी, फुलवंती ग,
जशी टवटवीत जास्वंदी ग,
आखीव रेखीव – ठाशीव ग,
जसे एखादे शिल्प-कोरीव ग,
मज वाटे तुझा अभिमान ग,
बघती तुला आ वासून ग,
तूच वनीची सुंदर हरिणी ग,
चपल, चंचल, कोमल ग,
निरुंद सिंहकटी तुझी ग,
चाल ऐटदार, बोल गोड ग,
वाणी कशी मंजुळ वाटे ग,
जणू निर्झर असे गाता ग,
तू येता वातावरणी गंध ग,
सुगंध असे तुझा जिवलग ग,
तू तरुण आरस्पानी चारुगात्री ग,
भासतसी मजला महाराणी ग,
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply