…. ही कथा आहे मी लहान असताना त्या वेळची काळ स्वस्ताईचा होता पैशाला फार किंमत होती आणि शेतकऱ्यांच्या मालाला किंमत अतिशय कमी होती. त्यावेळी एक रुपया म्हणजे गाडीच्या चकरा एवढा दिसत होता इतकी पैशाला किंमत होती. त्यावेळी गोडेतेल सात रुपये किलो होते तर बोकडाची किंमत पन्नास रुपये एवढी होती. माझा जन्म झाला आणि पूर्वीचे भोकाचे पैसे संपले आणि नवीन नाणी बाजारात येऊ लागली. त्यावेळी घरावर घालण्यासाठी राणीचे छाप असलेले कवल दोन पैशाला मिळत होते. घर दुरुस्त करायचे म्हटले तर अडीचशे रुपये पर्यंत घर दुरुस्त होत होते. त्यावेळी माणसे प्रेमळ होती आपलं तूपलं म्हणत होती एक प्रकारचा जेव्हा होता. मानसे तोंड भरून बोलत होती इतका मोठा प्रेमळ जिव्हाळा अजूनही माझ्या लक्षातून जात नाही. हल्ली माणसांचे स्वभाव भयंकर बदलले आहेत हे तर प्रखरतेणे जाणवते कलियुगामध्ये कलीच्या वाऱ्याप्रमाणे माणसे व पिढी बदलत गेली. हल्ली तर माणुसकीच राहिली नाही भावभावामध्ये भांडणे शेतीचे भांडणे. पंधरा गुंठे जमिनीसाठी भाऊ भावा बरोबर केस करून वकिलाची फी भरून केस लढत आहेत. वीस वर्षे केस चालली तरी निकाल लवकर लागत नाही अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे…।
… ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता. गावामध्ये वातावरण चांगले होते पण हातात पैसा नव्हता गावातील थोडीफार माणसे छोटे-मोठे उद्योग करत होते. त्या उद्योगातील हा टेलर मामा म्हणजे,, पांडुरंग कुंभार मामा,, ही व्यक्ती दोन्ही पायाकडून थोडीफार अपंग होती या माणसाला एक मुलगी व दोन मुले असा परिवार होता. हा पांडू मामा याचा स्वभाव अतिशय चांगला होता गावातील लोकांची जुनी नवी कपडे मशीन वर शिवत असे. दिसायला गोरापान या ट्रेलर मामा ना भिकुसा बिडी किंवा लाल धाग्याची बिडी ओढण्याची भयंकर सवय होती. त्यांच्या तीन मुलांमध्ये शिवाजी शिकलेला हा दोन नंबरचा मुलगा. तीन नंबरचा मुलगा बजरंग हा माझा बरोबर शाळेला होता. व पहिला नंबर चा मुलगा धोंडीराम हा एका डोळ्याने कमी दिसणारा मुलगा. हा धोंडीराम रेल्वे मध्ये भरती झाला बरेच दिवस त्याने रेल्वेमध्ये इंजिनीरिंग डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली. पण तो शेवटी एका डोळ्याने कमी असल्यामुळे मेडिकल नापास झाला हा सारा कर्मयोगाचा खेळ म्हणावा लागेल…।
… शेवटी धोंडीराम सुद्धा मेडिकल मध्ये नापास झाल्यामुळे गावात लोकांची शेती कामे करू लागला. माझ्या मुलांचे भले व्हावे म्हणून पांडुरंग कुंभार जीवापाड रात्रभर जागून. गावातील माणसांची कपडे मशीनवर शिवत होता. त्यावेळी डर्बी मशीन किंवा उषा मशीन अशा कंपन्या होत्या पण पांडू मामा गावांमध्ये फेमस होता. मुलांच्या सुखासाठी पांडू कुंभार यांनी मनामध्ये रंगवलेले स्वप्न त्यांच्या कामातून मला दिसत होते. आमच्या गावामध्ये सोपान कुंभार व पांडुरंग कुंभार हे दोन भाऊ आहेत हे मला नंतर समजले. कारण त्यावेळी मी लहान होतो खरंतर त्यावेळी ची अतिशय हुशार माणसे होती. परंतु पांडुरंग कुंभार यांचा विषय माझ्या अजून डोक्यात येतो. पूर्वीची माणसे राहिली नाहीत फक्त त्यांच्या आठवणी माझ्या डोक्यामध्ये येतात. जीवाला जीव देणारी माणसं परत यावी असा मला भास होतो. गोरापान पांडू कुंभार मला एकदा दिसावा असे माझ्या मनाला वाटते. जुन्या आठवणी अमर असतात परंतु त्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात असाव्यात असे मला वाटते…
–दत्तात्रय मानुगडे.
Leave a Reply