मॅरथॉनसाठी सराव करणाऱ्या डॉ. राकेश सिन्हा या विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वांनीच वाचले असेल. डॉ. सिन्हा अतिशय फिट होते. रोजच्या रोज सराव सुरू होता. लवकरच वयाची ६० वर्ष पूर्ण करणार होते. आजवर चार फुल मॅरेथॉनचा अनुभव गाठीशी असलेल्या, तसेच पुढील मॅरेथॉनसाठी नियमित सराव करणाऱ्या आणि अलीकडेच सर्व वैद्यकीय चाचण्यांतून त्यांचे निकाल सामान्य असलेल्या डॉ. सिन्हा यांचा सराव करताना मृत्यू का व्हावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किंबहुना, यामुळे एकूणच फिटनेस, त्याबद्दल मिळणारा सल्ला या संदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. खंरतर मॅरेथॉन रनिंगबद्दल अनेक कार्डिओलॉजिस्टनी अनेक धोके सांगून ठेवले आहेत. मलाही अनेकांनी याबाबत विचारणा केली. मात्र यातील तांत्रिक कारणांत सखोलपणे न जाता मी त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
जेव्हा तुम्ही कोणताही व्यायाम सुरू करता तेव्हा त्याकरिता लागणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला दोन प्रकारे मिळते. ग्लुकोज, फॅटस, किंवा फॅटी अॅसिड. साठवलिलेली ग्लुकोज ही लिव्हर, मसलमध्ये ग्लायकोजन म्हणून पदार्थ असतो त्यातून मिळते पण ती लिमिटेड असते. त्यामुळे ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो जो दीर्घकाळासाठी आवश्यक असतो तो फॅटसमधून येतो. ज्याला एक्स्ट्रिम व्यायाम, मॅरथॉन अथवा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे अाहे, अशा व्यक्तीच्या शरीरात एनर्जीची डिमांड वाढते. या वाढीव एनर्जीची डिमांडही पायासाठी पायाजवळील फॅट मधून अशी लोकल न राहता ती डिमांड शरीरभर पसरते. एखाद्या व्हॉटसअप अथवा फेसबुकवर ज्या प्रमाणे एखादा संदेश व्हायरल होतो तशाच प्रकारे शरीरभर जिथे फॅट ग्रुप आहेत तिथे असा संदेश जातो की आम्हाला आत्ता एनर्जीची गरज आहे तरी फॅटस् रिलिज करा. त्यानंतर अशा फॅट डेपोमधून रक्ताद्वारे फॅट रिलिज केल्या जातात. ज्या माणसांकडे फॅट डेपो लिमिटेड आहेत त्यांच्याकडून निर्माण होणारी फॅट आणि ज्यांच्याकडे फॅटचे साठे चांगले आहे, त्यांच्याकडून निर्माण होणारी फॅट यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे जो माणूस अतिशय फिट आहेत, ज्याकडे फॅटचे डेपो जास्त आहेत त्यांच्याकडे फॅट मोठ्या प्रमाणात लिबरेट होते.
आता फॅट आणि ग्लुकोजच्या मेटाबॉलिझममधील फरक समजून घ्यायला हवा. ग्लुकोज रिलिज झाली आणि ती मसलमध्ये जायला हवी असेल ती ज्या पेशीकाम करतात तिथवर पोहोचायला हवी असेल तर इन्शुलिन लागते. पण, त्याच्यावर एक मर्यादा असते. किती ग्लुकोज त्या पेशींमध्ये शिरावे. पण निसर्गाने अशी रचना केली आहे की जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा हा फॅटसचा साठा, त्याला पेशींच्या आत शिरायला कोणत्याही हार्मोनची गरज लागत नाही. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रचंड प्रमाणात व्यायाम करता त्यावेळी प्रचंड प्रमाणात फॅट लिबरेट होचे. मात्र ती, जाळली जात नाही. मात्र ती परत त्फॅट डेपोमध्येच जाईल असेही नाही. तर घर्षण झालेल्या रक्तवाहिन्यात किंवा विशेषतः ह्दयाच्या रक्तवाहिन्यात जिथे सर्वाधिक घर्षण होते तेथील रक्तवाहिन्यांमधील पातळ आवरणाखाली ती शिरते. तिथे ती त्रासदायक ठरते. केमिकल रिएक्शन तिथे सुरू होतात. तिथे प्लेटलेटस् थांबायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्तिक्थे सॉफ्ट प्लाक्स तयार होतात. आता माणूस जरी फिट असला तरी जेव्हा तो काम करतो अथवा व्यायाम करतो, त्यावेळी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, रक्तपुरवठा चांगला सुरू होतो. त्यावेळळी हा सॉफ्ट प्लाक त्रास देत नाही. पण ह्रुदयाची गती खूप वाढली आणि वाढलेलीच राहिली तर धर्षणामुळे हा साॅफ्ट प्लाक सुटा होतो आणि पुढे जाण्यास सुरुवात होते. हा सुटा प्लाक छोट्या रक्तवाहिन्यात शिरला तर ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होते आणि तीव्र हार्टअॅटॅक येतो. मॅरेथॉन किंवा अशा पद्धतीचे टोकाचे व्यायाम प्रकार करणाऱ्या लोकांमध्ये ही शक्यता अधिक असते. हे केव्हा होईल सांगता येत नाही. हे केवळ अॅन्जिओग्राफीकरूनच कळू शकते की हे सॉफ्ट प्लाक्स तयार झालेत अथवा नाही. अनेक इथियोपियन अॅथलिट आपण मॅरेथॉन धावताना पाहतो जे अतिशय बारीक असतात त्यांच्याकडे फॅटसटा साठा बेताचाच असतो. त्यांच्याकडे हा प्रकार होण्याची शक्यता खूप कमी असते. पण जी फिट माणसे आहेत ज्यांची मसल, ब्लड व्हेसल हार्र्ट छान डेव्हलप केलेले आहे परंतु, ज्यांच्या शरीरात फॅटचा साठाही जास्त प्रमाणात आहे. तर त्यांनाही शक्यता अधिक असते. जास्त प्रमाणात सुटणारी फॅट नीटपणे पुन्हा साठविली जात नाही. आणि त्यातून हे सॉफ्ट प्लाक तयार होतात आणि त्यातूनच हे अकाली मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते.
… म्हणून कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, जास्त प्रमाणात किंवा व्यायामाचा अतिरेक टाळावा, आपण त्याकरिता बनलेलो नाही. आणि करायचाच असेल तर करताना हार्ट रेट नियंत्रित राहण्याकडे लक्ष द्यावे. किंवा ज्यांना मॅरेथॉन अथवा तत्सम व्यायाम करायचे आहेत त्यांनी आपल्या शरीरातील फॅटचे प्रमाण हे नेहमी २३ टक्क्यांच्या खाली ठेवल्यास ते उपयुक्त ठरू शकते. पण सध्या मॅरेथॉन धावण्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. लोकांना वाटत की आपण भारताला फिट करत आहोत पण ज्यावेळी आपण धावत नसतो किंवा त्या स्पर्धा नसतात त्यावेळी आपण आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देत नसतो, यामुळे अतिरिक्त फॅटस् शरीरात साठवतो. तेव्हा या दुर्देवी घटनेतून आपल्याला धडा घ्यायला हवा की, मॅरेथॉन धावायची असेल तर आपल्या शरीरातील फॅटसचे प्रमाण हे नियंत्रित हवे तरच आपल्याला यातील जोखीम कमी करता येईल.
— डॉ. नितिन पाटणकर
मधुमेहतज्ज्ञ, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन विषयाचे मार्गदर्शक.
अधिक माहितीसाठी संपर्क – 9223145555
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Leave a Reply