सुंदर जग पाहण्याची किमया आपण फक्त डोळ्यांनीच करू शकतो. म्हणूनच डोळ्यांचे आपल्या जीवनामधील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. मात्र असे असतानाही आपण डोळ्यांची काळजी घेण्याबाबत तितकेसे सिरिअस नसतो. डोळ्यांची कार्यक्षमता, आरोग्य राखलं तर आपलंच भविष्य सुखकारक होईल म्हणून डोळ्यांची आत्तापासूनच काळजी घ्या… ती कशी यावर नजर टाकुयात…
पुरेशी झोप घ्यावी यासाठी रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.
दिवसातून दोन वेळा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.
डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये. संगणकावर सलग काम करु नये. मधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी. वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.
प्रवासामध्ये वाचू नये.
अपुऱ्या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.
अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये. सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्यायामालाही महत्त्व आहे. डोळ्यांचे दोन महत्त्वाचे व्यायाम आपण घरच्या घरीही करू शकतो.
1) एका पुठ्ठ्यावर काळा ठिपका काढावा. त्याकडे एकटक पाहावे. असे केल्याने दृष्टी सुधारतेच; पण मनही एकाग्र होते.
2) काळा ठिपका पुठ्ठ्यावर काढून पुठ्ठा गोल फिरवावा व ठिपक्याकडे एकटक पाहावे. असे करताना बुबळे फिरतील व डोळ्यांचा व्यायाम चांगला होईल. या व्यायामांच्या माध्यमातून डोळ्यांभोवती असलेल्या आठ स्नायूंची क्षमता वाढवता येते.
Leave a Reply