आज महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारीला उधाण लागलेलं आहे आणि इकडे काही लोकांचं वृत्तपत्रातील दोन दिवसा पूर्वी दिलेलं मत देण्यात आल होत की २०१७ म्हणजे नौकरीचे वर्ष पण त्याच दिवसी UN ची Report आहे की २०१७-२०१८ वर्षात ५० टक्के बेरोजगारी वाढणार आता विश्वास कोणावर ठेवायचं , Report वर की या लोकांवर ?
आज MPSC च्या नावाखाली ५० ते ९० हजार पैसे वसूल करतात , काय ते मोठ्या -मोठ्या गोष्ट्या सांगतात , नोट्स च्या नावाखाली काहीतरी देतात जे नवीन विद्यार्थ्यांना कळत सुद्धा नाही . हेच लोक म्हणतात की आम्ही या क्षेत्रातील तुर्रेखान झालोय . अरे पण लक्षात असू द्या आणि हो तुमची कितीही loby असू द्या पण आमच्या पाठीसी माझी युवक फौज आहे . याद राखा ज्या दिवसी युवक खवळला न ,राख होईल तुमची , म्हणून थोड आता आवरा ( हमने भी कच्ची गोलिया नही खेली ).
पुस्तकांची पण किमत सिखरेला पोहचली असते आणि त्यात काय तर Copy पेस्ट . क्लास मध्ये पण काय शिकवतात तर क्लास 3 च्या परिक्षेची माहिती, ती पण बरेच मुल यांच्या विश्वासावर राहिले तर पास होत नाही ,
एकाच विद्यार्थ्याचा फोटो बर्याच क्लास वाल्यांच्या ब्यानर वर झळकतो . गल्लोगली क्लास निघालेत आणि पैसे देणारे विद्यार्थी पण आपण आहोतच . (बळीचे बकरे .)
हेच लोक आम्ही जर online मिडिया वर त्याच गोष्टी कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यात तर आमच्या विरोधात जातात वेगवेगळे review देतात पण आम्हाला काही फरक पडत नाही. आमची ही चळवळ पुढेही सुरु असेल .( कुत्ते भुके हजार हाती जाये बाजार )
माझा यांना प्रश्न आहे की यांनी तयार केलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन आयोगाला Chalenge करू शकतो काय ? मग ती पुस्तक एखाद्या अधिकार्याने लिहलेली असेल किवा कोणताही प्रकशकाने Published केली असेल , जर त्यांची पुस्तक आयोग ग्राह्य धरत असेल तर आम्ही तयार केलेल्या पुस्तकांनासुद्धा आयोग ग्राह्य धरेलच आमचे पण स्त्रोत शालेय पुस्तके, Gov. साईट , NCERT , मराठी विश्वकोश हेच आहेत , यांनी काय वेगळे लिहलय काय ?
मित्रानो इथे बहुतेक संकलक आहेत निर्माते फार कमीच , म्हणून तुम्हाला जे पटते तेच वापरा , आयोग ग्राह्य धरतो शालेय पुस्तके , विद्यापीठांची पुस्तके किवा शाशनाची अधिकृत माध्यमे, आम्ही -तुम्ही फक्त माध्यम आहोत म्हणून जास्त “वर उड्या मारू नका कारण आता तुम्ही जास्त दिवस विद्यार्थ्यांना उल्लू नाही बनवू शकणार , आता तुमची दुकानदारी बंद होण्याच्या मार्गावर आलीय म्हणून हे धंदे सुरु केलेय , माझ त्या अधिकार्यांना पण प्रश्न आहे की कश्याला तुम्ही विद्यार्थ्यांना मोठमोठ्या फेकून ( म्हणजे क्लास चालक जस बोलायला लावेल तस बोलून ) मिसगाईड करताय जे Real आहे ते सांगा. बर्याच अधिकाऱ्यांचे धंदे माहीत आहेत. काही तर मोठ्या पदावर असूनसुद्धा लग्न झालेल्या मुलीला whatsapp , fb वर रात्री विचारतात की तुझ लग्न झालाय काय ? त्यांचे screen shot पण आहेत आमच्याकडे जे त्या स्वतः मुलीने पाठवलेत , पण इथे ते देणार नाही . बेडकाला वाटते की विहीरच माझ विश्व ( प्रामाणिक अधिकारी सोडून ) .
50 टक्के बेरोजगारी या क्लास चालकांनी निर्माण केलीय विद्यार्ह्याना MPSC ची स्वप्न दाखवून . स्वप्न बघणे चुकीचे नाही पण डोळे उघडे करून स्वप्न बघा डोळे बंद करून नाही . मित्रांनो एक लक्षात ठेवा या नवीन बने बनावट ( ज्यांना नशिबाची साथ मिळाली ) अधिकाऱ्यांवर तसेच त्यांचा संबध असणार्या Academy चालकांवर विश्वास ठेऊ नका , स्वतःवर विश्वास ठेवा ( प्रामाणिक अधिकाऱ्यांवर नक्कीच विश्वास ठेवा ) .
सेवटी अभ्यास स्वतःला करावा लागतो . आमचा विरोध कराल तरी चालेल , पण ही स्पर्धा चळवळ थांबणार नाही , तुम्ही लोक काही बोलाल तरी काही हरकत नाही आमच्या पाठीसी विद्यार्थ्यांची फौज आहे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे जे पटते ते घ्या बाकीच सोडून द्या . विद्यार्थीहितार्थ जाहीर !
— प्रा. हितेशकुमार पटले
Leave a Reply