तक्षशिला विद्यापीठात शिकवले जाणारे पाठ्यक्रम
विद्यापीठात वेगवेगळे पाठ्यक्रम शिकवले जात. त्यात वेद त्यांच्या सहायक सहा शाखा. वेदाचे योग्य ऊचारण, वेगवेगळे साहित्य, विधी, यज्ञ व्याकरण, जोतिषशास्त्र , छंदशास्त्र आणि त्याची व्युत्पत्ती, या अभ्यासाचा उपयोग वेद आणि त्याच्या शाखा यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी होत असे.
या शाखापैकी काही शाखा असत, सांखया, न्याय वैसेशीखा, अंकगणित , संगीत, औषधे पुराण, इतिहास, युद्धशास्त्र, काव्य, कायदा बीजगणित, शेती, वाणिज्य, पशूउत्पादन, लोहारकाम, सुतारकाम, वैद्य, शल्यचिकित्सा , धनुष्य बाण , गुप्त खजिना शोधन, नृत्य, चित्रकला.
शिकवले जाणारे पाठ्यक्रम जोपर्यंत विद्यापीठ होते तो पर्यन्त शिकवले जात होते. ज्या वेळी वाटे की सामाजिक , राजकीय, धार्मिक बदल होत असे त्यावेळी त्यामध्ये भर घातली जात असे.
परकीय आक्रमण
इसापूर्व सहाव्या शतकात पर्शियाने आक्रमण केले, त्यावेळी ब्राह्मी लिपीची जागा खारोषतरी लिपीने घेतली.
इसा पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीक आक्रमण झाले त्यामुळे त्यांचे अधिकचे पाठ्यक्रम शिकवू जाऊ लागले. ग्रीक भाषा शिकवू जाऊ लागली. गुरुजनांना ती भाषा शिकवण्यात कोणताही कमीपणा वाटत नसे इतके ते उदार मनाचे होते.
ग्रीकांची जागा पहिल्या शतकात कुशाणांनी घेतली. पण त्यांची अशी स्वताची संस्कृति नव्हती. त्यामुळे फारसा फरक पडला नाही.
पाचव्या शतकात हुणानि जागा घेतली. बुद्धीझमचा विद्यापीठावर भरपूर प्रभाव पडला. जो इसापूर्व सहाव्या शतकात जन्माला आला. बुद्धीझमला पाठ्यक्रमात जागा मिळाली.
विज्ञान शाखेत लेखी व सराव दोन्ही परीक्षांचा अभ्यास करावा लागे, पण खरा सराव विद्यार्थी शिक्षण संपवून बाहेर पडत असे, व आयुष्याची सुरवात करत असे तेव्हाच होत असे. वैद्यक शास्त्रात विद्यार्थी पूर्ण पारंगत झाला आहे की नाही याची खात्री करूनच त्याची परीक्षा घेतली जात असे.
पाचव्या शतकात विद्यापीठाचा शेवट झाला.
– रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply