देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते…१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो…३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई….४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply