साहित्य-
१ किलो चिकन,
१०-१२ लसुन पाकळ्या,
आल्याचा मोठा तुकडा,
अर्धी वाटी दही
२ लिंब,
मीठ,
२ चमचे साजुक तुप
मसाला – २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पुड, १ चमचा गरम मसाला.
कृती –
चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे.
वाटण, दही व हळद, तिखट सर्व मसाला लावून चिकन चार तास तसेच मुरत ठेवावे.
हे मुरलेले चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅस तंदूरमध्ये भाजावे. कोळशाच्या शेगडीवरही सळईत चिकन घालुन भाजता येते. साधारणपणे २० मिनिटात चिकन सगळीकड़ुन बाजू बदलत भाजावे.
मस्तपैकी चिकन तंदुर खाण्यासाठी तयार.. !!
पूजा प्रधान
Leave a Reply