सतत गुंतलो आहो सारे
शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’
युगानूयुगे प्रयत्न होतो
मिळवण्यासाठींच प्रभूला…१
बाह्य जगाचे सुख आगळे
लागले सारे त्याच्या पाठीं
‘देह सुख’ अंतीम वाटे,
खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२
‘ज्ञानामध्ये’ भरला ‘आनंद’
समजूत झाली ही कांहींना
लेखक, कवी, साहीत्यिक हे
पाठ त्याची कांहीं सोडीना…३
साधू संत हे थोर महात्मे
आनंद शोधूती ‘विश्रमांत’
‘ध्यान’ लावून एक मनानें
शांत होवूनी डूबती त्यांत…४
आनंदची ‘मोक्ष’ असून
ध्येय साऱ्यांचे त्याजकडे
मार्ग सर्वांचे वेगळे असून
‘तन्मयता’ खेची प्रभूकडे…५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply