आरोग्य सेतू अँड्रॉइड अँप
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. केंद्र सरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे.
प्ले स्टोरवरून किंवा लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे अँप डाऊनलोड करू शकता.
आरोग्य सेतू अँपचा वापर:
–या अँप मध्ये एक सेल्फ असेसमेंट टेस्ट दिली आहे त्याचा वापर करून तुम्हाला कोरोना होण्याचा कितपत धोका आहे हे तपासून पाहू शकता.
–COVID – 19 हेल्प सेंटर हेल्पलाइन या पर्यायादवारे तुम्हाला विविध राज्यातील कोरोना
हेल्पलाइन नंबर पाहायला मिळतील.
–COVID -19 अर्थात कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहीती COVID -19 या पर्यायाद्वारे मिळेल.
–याशिवाय या अँपचा चौथा आणि महत्वपूर्ण वापर म्हणजे हे अँप आपल्याला कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आपण आल्यास आपल्याला अलर्ट करते, याशिवाय तुम्ही कोरोना बाधित क्षेत्रातून प्रवास करत असल्यास तुम्हाला तसे सूचित करते.
सद्यस्थितीत पोलीस,डॉक्टर, किराणा दुकानदार, वैद्यकीय आणि इतर कर्मचारी यांच्यासाठी हे अँप अतिशय ऊपयुक्त असले तरी lockdown संपल्यानंतर सर्वांनाच याचा वापर करावा लागणार आहे.
अँप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/
आरोग्य सेतू अँप बद्दल मराठीतून माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर
क्लिक करा.
Leave a Reply