मित्रांनो आजचा जमाना हा ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. घरबसल्या आपल्या फोनद्वारे आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपासून ते मोबाईल इलेक्ट्रॉनिक, कपडे आणि अगदी फर्निचर देखील आपण सर्व काही ऑनलाईन मागू शकतो. अर्थातच त्यामुळे आपले जीवन अधिक सुखकर झाले असले तरी ऑनलाईन शॉपिंग करत असताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याकरिता ऑनलाइन शॉपिंग तुम्ही करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
- प्रॉडक्ट रिव्यू व रेटिंग
कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी मित्रांनो त्या प्रॉडक्ट अथवा वस्तूविषयी ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाईटवर रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा. ते प्रॉडक्ट ज्यांनी खरेदी केलेले आहे त्यांचे अभिप्राय वाचा आणि त्यांनी दिलेले रेटिंग पहा. त्यावरून त्या प्रॉडक्ट विषयी तुम्हाला वस्तुनिष्ठ अभिप्राय मिळेल. साधारण तीन स्टार पेक्षा जास्त रेटिंग असलेल्या प्रॉडक्टची खरेदी करा.
2. सेलर रँकिंग व रेटिंग
ऑनलाइन शॉपिंग या वेबसाईटवर जसं प्रॉडक्ट किंवा वस्तूचे रेडींग दिलेलं असतं त्याचप्रमाणे ते प्रॉडक्ट विकणाऱ्या विक्री त्याचं म्हणजे सेलचा देखील रेटिंग वर्णन केलेले असते तेथे तुम्ही या पेजवर सर्वात खालच्या बाजूला पाहू शकता हे रँकिंग प्रत्येक वस्तू नुसार व त्यानुसार केलेले असते त्यामुळे आपल्याला त्या विक्री त्याचा दर्जा समजतो. त्यामुळे प्लॉट खरेदी करण्यापूर्वी त्या सेलचे रँकिंग पाहिला विसरू नका प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्या सेलचे रँकिंग पाहायला विसरू नका.
- प्रॉडक्ट रिटर्न पॉलिसी
कोणत्याही ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी ते प्रॉडक्ट रिटर्न करायचे झाल्यास त्यासंदर्भात कंपनीची प्रॉडक्ट रिटर्न पॉलिसी काय आहे हे समजून घेणे आवश्यक असते. म्हणजेच तुम्हाला एखादे प्रॉडक्ट खराब लागले अथवा तुम्हाला नको असल्याने परत करायचे असल्यास त्या संदर्भात प्रत्येक कंपनीची वेगवेगळी पॉलिसी असते आणि कोणत्या बाबतीत प्रॉडक्ट परत घेतले जाणार नाही याबाबत पूर्ण माहिती प्रॉडक्ट रिटर्न पॉलिसी मध्ये दिलेली असते. कोणत्याही प्रॉडक्ट खालीच त्याविषयी माहिती असणारी लिंक दिलेली असते.तेथे क्लिक करून तुम्ही त्या विषयी माहिती वाचून घेऊ शकता.
- पेमेंट करण्याची पद्धत
मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग करताना पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यांपैकी सीओडी म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरी ही सर्वोत्तम पद्धती आहे असे मला वाटते. प्रॉडक्ट तुमच्या हातात आल्यानंतर पैसे देणे कधीही योग्य. परंतु सर्व प्रोडक्टसाठी हा पर्याय दिलेला नसतो. त्त्यावेळीतुम्ही पेमेंट करण्यासाठी UPI ची निवड करा आणि त्याद्वारे पेमेंट करा त्यामुळे तुमच्या अकाउंट विषयी व डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड विषयीची संवेदनशील माहिती उघड न करता शॉपिंग करता येईल. ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर तुमची अशी अकाउंट संदर्भातील माहिती सेव्ह करून ठेवणे टाळा.
5. लिंकद्वारे शॉपिंग
मित्रांनो तुमच्या फेसबूक अथवा व्हाट्सअप यांसारख्या सोशल मीडिया वरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करून शॉपिंग करू नका. त्यामुळे तुमची माहिती चोरली जाऊ शकते आणि त्याद्वारे तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.(हे phishingअटॅक असतात त्याविषयी दुसर्या लेखात माहिती देतो.) त्यामुळे शक्यतो ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध व विश्वसनीय अशाच शॉपिंग वेबसाईटवर जाऊन शॉपिंग करणे योग्य ठरते.
- प्रॉडक्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ
ऑनलाइन शॉपिंग करून मागवलेले प्रॉडक्ट ओपन करतानाचा व्हिडिओ जरूर बनवा. तो यासाठी की कदाचित प्रॉडक्ट खराब लागले अथवा चुकीचे निघाले तर तुमच्याकडे व्हिडिओ स्वरूपात एक पुरावा राहील.अर्थात प्रॉडक्ट खराब निघाले तर लगेच बदलून दिले जाते,पुराव्याची मागणी सहसा केली जात नाही. परंतु आपल्या हितासाठी आपण व्हिडिओ बनवून ठेवणे कधीही चांगले.
अशा पद्धतीने तुम्ही वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवून ऑनलाइन शॉपिंग केल्यास तुम्हाला कोणतीही फसवणूक होण्यापासून सुरक्षित राहता येईल.
— विजयकुमार काशिनाथ पाटील
Leave a Reply