नवीन लेखन...

तंत्रविश्व – भाग ६ : उत्पन्नाचा ऑनलाइन मार्ग शोधताना..

    कोरोनामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या  पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर  मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल.

 उत्पन्नाचे ऑनलाइन मार्ग शोधताना पुढील मध्ये लक्षात ठेवावेत.

1. आवड व वेळ यानुसार योग्य निवड

Online Earning करण्याचे अनेक विविध मार्ग उपलब्ध आहेत परंतु त्यातील योग्य पद्धतीची निवड करणे देखील महत्वाचे असते. त्यासाठी तुमची आवड आणि तुम्हाला मिळणारा वेळ यानुसार निवड करणे योग्य ठरते.येथे आवड हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ऑनलाइन अर्निंग करताना कामातील सातत्य महत्वाचे  असल्याने  तुमची आवड असल्यास हे तुम्हाला सहज शक्य होईल, कारण आवडीच्या कामाचा कंटाळा येत नाही. त्यात आपल्याला आनंद मिळत असतो.

2. विश्वसनीय व परिपूर्ण माहिती

 ऑनलाइन अर्निंग करू इच्छिणाऱ्या परंतु अपयशी ठरलेल्या बहुतांशी व्यक्तीच्या बाबतीत त्यांनी या पद्धतीविषयी घेतलेली अपुरी माहिती व गैरसमजुती या गोष्टी कारणीभूत असतात. त्याकरिता ऑनलाइन अर्निंग करण्याचे विविध पर्याय समजून घेतल्यानंतर त्यातील योग्य पद्धत निवडणे आणि त्या पद्धती विषयी पूर्ण आणि विश्वसनीय माहिती मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी युट्युब व्हिडीओ ,ऑनलाइन कोर्स ,विश्वसनीय वेबसाईट यांसारख्या स्रोतांचा तुम्ही वापर करू शकता.तुम्ही निवडलेल्या ऑनलाइन अर्निंग करावयाच्या  पद्धतीचे फायदे व तोटे, त्या पद्धतीने काम केल्यानंतर कशा पद्धतीने उत्पन्न मिळणार आहे, त्यासाठी किती वेळ द्यावा लागणार आहे  आणि तेवढा वेळ आपल्याला सातत्याने देतायेईल का हे पाहणे गरजेचे असते.

3. उत्पन्नाच्या वास्तव अपेक्षा

 यूट्यूब चैनल सुरू करा लाखो रुपये कमवा, पाचशे रुपये पर क्लिक कमवा , ad पोस्ट करा दिवसाला एक हजार रुपये कमवा यांसारखे आकर्षक शिर्षकाचे  अनेक युट्यूब व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यामुळे ऑनलाइन अर्निंग बाबत अवास्तव अपेक्षा व गैरसमजुती निर्माण होतात. वरील पद्धतीने आणि तेवढ्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत असे नाही परंतु त्यासाठी किती दिवस काम करावे लागणार आहे आणि कशा पद्धतीने काम करावे लागणार आहे हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

ऑनलाइन  पद्धतीद्वारे खात्रीने व निश्‍चित उत्पन्न मिळत असले तरी ती एका रात्री घडणारी गोष्ट नाही.त्यासाठी बरेच दिवस आणि काही उत्पन्नाच्या मार्गाबाबत काही महिने सातत्याने  काम करावे लागते. थोडक्यात उत्पन्न किती मिळणार आहे हे त्यासाठी किती काम कराल यावर अवलंबून असेल.

ऑनलाइन  अर्निंगद्वारे  लाखो रुपये  जरूर कमावता येतात,परंतु त्यासाठी काही वर्षे मेहनत करावी लागते ही गोष्ट लक्षात ठेवून सुरुवातीलाच उत्पन्नाच्या अवास्तव अपेक्षा न ठेवणे योग्य राहील.

4.मार्केटिंग  व ब्रँडिंग

 ऑनलाइन अर्निंग  करण्याच्या  सर्व पद्धतीविषयीविषयी ‘Traffic is King’  हे वाक्य लागू पडते.ऑनलाईन पद्धतीद्वारे मिळणारे उत्पन्न तुम्ही किती लोकांपर्यंत  तुमचे काम पोहचवता यावर अवलंबून असते.अल्पावधीत हे साध्य करण्यासाठी  गुगल ads, फेसबूक  जाहिरातीचा वापर करता येऊ शकतो.त्या अनुषंगाने जाहिरातीचे  हे नवीन तंत्र देखील शिकून घेणे गरजेचे असते.सोशल मीडियाचा देखील प्रभावीपणे वापर करून अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल.

5.  तुलना नको

ऑनलाइन अर्निंग करताना आणि आपल्याला आयुष्याच्या बाबतीत देखील लागू पडणारा नियम म्हणजे कोणत्याही प्रकारची इतरांशी तुलना नको.

 ऑनलाइन अर्निंग करण्यास आपण सुरुवात करतो तेव्हा  त्या पद्धतीद्वारे यशस्वी झालेल्या व्यक्तीशी आपण तुलना करू लागतो,त्यामुळे काम करण्याची प्रेरणा कमी होते.

  होत असलेल्या चुका समजून घेवून त्या सुधारणे,तुलना न करता सातत्याने काम करीत राहणे महत्वाचे असते.

  शेवटी ऑनलाइन earning करण्याचा आपण निवडलेला मार्ग हा केवळ उत्पन्नाचा नाही तर आपला हक्काचा निखळ आणि अविरत आनंद मिळविण्याचा स्रोत आहे हे देखील विसरता कामा नये.

— विजयकुमार काशिनाथ पाटील 

Avatar
About विजयकुमार काशिनाथ पाटील 11 Articles
नमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अधिक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..