नवीन लेखन...

तंत्रविश्व – भाग ८ : उत्पन्नाचा पर्यायी स्रोत – शेअर मार्केट

2020 आणि 2021 ही दोन वर्षे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरतील अशी वर्षे असणार आहेत.कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे निर्माण   झालेल्या विविध क्षेत्रातील  अभूतपूर्व बदलाचे परिणाम अजून काही महिने तरी जाणतील असे चित्र आहे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना याचे परिणाम फारसे जाणवले नाहीत ,परंतु मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेअर मार्केट  करू पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.कुणी आर्थिक गरजेपोटी तर कोणी केवळ मित्र करतो म्हणून तर काही जण केवळ trend  आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा अभ्यास अभावी फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. 

कोणतीही गोष्ट शिकण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्या पद्धतीने ती गोष्ट समजून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याने ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, गरज असते योग्य मार्गदर्शन घेण्याची!  येथे योग्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे कारण केवळ दोन-चार युट्यूब व्हिडिओ पाहून किंवा एक दोन लेख वाचून तुम्ही लगेच ट्रेडिंग करायला लागलात तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी शेअर मार्केट विषयी परिपूर्ण माहिती घेऊन त्याच्यातील धोके जाणून घेऊन या मार्गाचा अवलंब केल्यास इच्छित उत्पन्न मिळवता येते, अन्यथा अतिआत्मविश्वास विनाशाकडे घेऊन जातो. 

     तुम्हीदेखील शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल  तर पुढील काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  1. बेसिक गोष्टी शिकणे 

            मित्रांनो कोणत्याही गोष्टी 2 लेवल मध्ये  शिकायच्या असतात, पहिली बेसिक लेवल असते तर दुसरी आडव्हान्स किंवा एक्सपर्ट लेवल असते.त्यांना आपण टप्पे देखील म्हणू शकतो. या गोष्टी शेअर मार्केट बाबतीत देखील लागू होतात.  शेअर मार्केट मध्ये प्रवेश करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला शेअर मार्केट विषयी प्राथमिक माहिती घेणे अतिशय आवश्यक ठरते, ही बेसिक लेव्हल पूर्ण केल्यानंतरच तुम्ही  आत्मविश्वासपूर्वक ट्रेडिंग करू शकता. बेसिक लेवल एकदा क्लियर झाल्यानंतर आणि तुम्ही ट्रेडिंग करून आल्यानंतर आपोआपच तुम्ही  ऍडव्हान्स लेवल देखील पूर्ण कराल. 

  बेसिक गोष्टींमध्ये शेअर मार्केटची प्राथमिक ओळख, शेअर मार्केट विषयी सर्व संकल्पना, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती, प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे, तांत्रिक बाबी  यांसारख्या गोष्टी तपशीलवार समजून घेणे गरजेचे असते. 

शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी विविध स्रोत सध्या उपलब्ध आहेत,  पुस्तके, ऑनलाईन कोर्स, यूट्यूब व्हिडिओ, विविध लेख,  वेबसाईट   अशा संमिश्र  स्रोतांचा वापर  बेसिक शिकण्यासाठी करणे योग्य ठरते.त्यामुळे माहितीची सत्यता देखील तपासता येते आणि शिकलेल्या   संकल्पना अधिक पक्क्या होतील. 

2.पेपर  ट्रेडिंग अथवा सिम्युलेटर ॲपचा वापर  

        मित्रानो शेअर मार्केट विषयी बेसिक गोष्टी शिकल्यानंतर त्याची प्रात्यक्षिके देखील करणे गरजेचे असते,अशा वेळी प्रत्यक्ष अकाउंट काढून लगेच ट्रेडिंग करणे कदाचित नुकसानकारक ठरू शकते अशावेळी काही दिवस पेपर ट्रेडिंग करणे योग्य ठरते.  म्हणजे सध्या आपण ट्रेडिंग करत आहोत असे गृहीत धरून इच्छुक शेअरची खरेदी आणि योग्य वेळी विक्री  प्रत्यक्षात न करता केवळ पेपरवर करणे आणि त्याद्वारे नफ्या तोट्याचा हिशोब करणे यास पेपर ट्रेडिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने थोडे दिवस प्रॅक्टीस करणे गरजेचे असते.

  सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सिम्युलेटर ॲप देखील आलेले आहेत त्याचा वापर करुन तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग केल्यासारखे सर्व गोष्टी करू शकता. ज्यामध्ये प्रत्यक्षात आपले पैसे इन्व्हेस्ट  केलेले नसतात. उदाहरणार्थ मनी कंट्रोल ॲप.

      पेपर ट्रेडिंग किंवा सिम्युलेटर ॲप्स वापरण्याचा सराव केल्यामुळे दोन फायदे होतात,  एक म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले नसल्यामुळे ट्रेडिंग मध्ये तुमचे नुकसान झाले तरी प्रत्यक्षात एक रुपया देखील जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला कशा पद्धतीने फायदा तोटा होऊ शकेल याचा एक अंदाज तुम्हाला येतो म्हणजे जो अनुभव तुम्ही काही पैसे घालवल्यानंतर मिळवला असता तो पूर्णपणे मोफत मिळवू शकता.

    अशा पद्धतीने ट्रेडिंग करण्याचा  काही महिने सराव केल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल तुम्हाला स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी ठरवता येतील कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करावे हे ठरवता येईल. त्यासाठी या  पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

 

3.गुंतवणूक करावयाची रक्कम

 

      शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही  बेसिक गोष्टी शिकून घेतल्या, काही महीने प्रात्यक्षिक देखील केले त्यानंतर मुख्य तिसरा टप्पा  प्रत्यक्षात गुंतवणूक  करण्याचा येतो. अशा वेळी दोन प्रश्न निर्माण होतात.

 -शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी?

 -गुंतवणूक कशी असावी?

साधारणपणे शेअर मार्केट विषयी गोष्टी शिकताना तुम्ही या गोष्टी देखील समजून घेणे गरजेचे असते.कारण प्रत्यक्षात ट्रेडिंग करण्यास सुरुवात करताना  वरील प्रश्न निर्माण होतात.शेअर मार्केटमध्ये किती रक्कम गुंतवावी याची काही मर्यादा नसते ते तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते आणि व्यक्तीपरत्वे  ते बदलते. तुमचा दैनंदिन खर्च भागवून ,भविष्यकालीन येणाऱ्या   समस्यांचा  आणि गरजांचा विचार करून थोडीबहुत बँकेत शिल्लक रक्कम  ठेवून उरलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी  करू शकता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना किंवा कर्ज काढून कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. उत्पन्नाचा  एक पर्यायी स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे.

शेअर मार्केट मध्ये किती रक्कम गुंतवावी  याच्या नंतर अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो  ही गुंतवणूक कशी असावी ?आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्वरित, मध्यम व दीर्घकालीन असे परतावा देणारे  तीनही पर्याय येथे उपलब्ध असतात. तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार यातील योग्य पर्यायाची निवड  करणे गरजेचे असते. 

       

4.अपेक्षा कमी आणि संयम जास्त असणे गरजेचे

            गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपैकी सर्वोत्कृष्ट पर्याय शेअर मार्केट असला तरी  याद्वारे  प्रत्येक व्यक्तीला मिळणारा परतावा  मात्र वेगळा असतो, कारण प्रत्येकाचे ज्ञान,  ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एक्सपर्ट लेवल यामध्ये फरक असतो.

        त्यामुळे सुरुवातीला अपेक्षा कमी ठेवणे आणि थोडाफार संयम ठेवणे गरजेचे असते.

    तुमच्या परिचित एखाद्या व्यक्तीस तुमच्या एवढीच गुंतवणूक करून  कदाचित तुमच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील  किंवा मिळतील, अशावेळी तुम्ही संयमी राहणे गरजेचे आहे. त्याच्याशी तुमची तुलना न करता आपण ठरवलेली एक निर्धारित रक्कम कशी मिळवता येईल हे पाहणे गरजेचे असते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास  करून वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाहणे गरजेचे असते. 

         शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी  हे चार टप्पे समजून घेतले तर  गुंतवणुकीच्या इतर  पर्यायांच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच जास्त रिटर्न शेअर मार्केटद्वारे मिळतील.त्याकरिता सुरुवातीला संयम ठेवून आणि अपेक्षा कमी ठेवून तुम्ही काम केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल.

— विजयकुमार काशिनाथ पाटील

Avatar
About विजयकुमार काशिनाथ पाटील 11 Articles
नमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अधिक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..