तिला सांगितले टपरीवर ये..आम्ही नेहमी टपरीवरच भेटायचो , चहा मारत मारत मारत गप्पा सुरु मग जायचे कुठे ठरवत असू .
टपरी नेहमीचीच ठरलेली..
आम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो.
ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो परंतु एका चहासाठी ३० -३२ रुपये टू मच ..वाटत असे,
म्हणून जवळच्या टपरीवर सात रुपये कटींग बेस्ट..
कटींग मध्ये जी मजा असते ती कुठेच नसते राव.
हा तर आम्ही खरे भेटलो पहिल्यांदा टपरीवरच..
तशी ती मला पहिल्यांदा टप्पोरीच वाटली.
मोठी बाईक आणि आणि तिच्या हातावर मोठे टॅटू
..आयला सॉलिड
आयटम ध्यान होते… पण खूप मोकळी मुलगी ती.
खरेच आम्ही खूप भेटायचो.
सगळ्यांना वाटायचे आमचे लफडे आहे तसे पाहिले तर लफडे वगैरे काही नाही परंतु एकमेकांपासून चैन पडत नसे.
मनात काही फारश्या कल्पना नाहीत,
कुठलाही भ्रम वगैरे काही नाही.
माझे काम संपले की भेटत असू ,
तिचाही बिसनेस होता..कोणता माहीत आहे का ?
ती उत्तम बाईक मेकॅनिक होती.
तिचे गॅरेज होते.
अर्थात मी पण इंजिनीअर
पण सिव्हिल..
म्हणजे दोघेही तसे रानटीच म्हणावे लागतील..
आमच्या गप्पा मस्त होत असत.. आमची दोस्ती म्हणजचे आमच्या एरियात कुतूहल होते, आईबाबा गावी होते.
एके दिवशी जाम पकलो..
ती पण जाम पकली ह्योती दरोरोज काय तेच तेच…
एके दिवशी म्हणाली आपण लग्न करून बघायचे का..?
बघायचे का..?
‘ बघायचे का ? ‘ ह्या शब्दावर ती ‘ प्रॅक्टिकल ‘ जोर करून म्हणाली.
म्हणालो…त्यात काय करू की ..दोघेही कमवत होतो , घरही होते..
नॉट बॅड आयडीया ..
मी म्हणालो..
पण फुकट बोबाबोंब नको..
ओके ..ओके ..ती म्हणाली..
सरळ काही दिवसात रजिस्टर लग्न केले..
आज मस्त सुखी आहोत..
आजही टपरीवर येतो…
टपरीवाला मात्र खुश ..
कारण त्याच्यामुळेच झाले…
आता पुढे काय म्हणाल ..मित्रानो..
सॉलिड ना..
तुम्ही पण असेच करून बघा..
जर झालेले नसेल तर…लग्न .
फुकट लटकत बसू नका…
कॅलेडर प्रमाणे
नुसतीच फडफड…
सतीश चाफेकर
Leave a Reply