पूजित होतो प्रभूसी,ध्यान एकाग्र करुनी
भाव भक्तिने तल्लीन,होत असे भजनी ।।१।।
काव्यस्फूर्ति देऊनी,कवि बनविले मजला
शब्दांची फुले गुंफवूनी,कवितेचा हार बनवविला ।।२।।
सुंदर सुचली कविता,आनंदी झाले मन
ध्यास मज लागता,गेलो त्यांतच रमून ।।३।।
पुजेमधले लक्ष्य ढळले,काव्याच्या मागे जावूनी
भजनांतील चित्त वेधले,तपोभंग तो होऊनी ।।४।।
मधाचे बोट चाटवूनी,मोहात ओढले मजला
दूर सारुनी अमृत घट,परिक्षा घेता झाला ।।५।।
अडथळे येऊनी तप साधनेत,कस लावतो सत्वाची
हीच आहे प्रभूची रीत,परिक्षा घेई भक्ताची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply