इकडून तिकडे सुसाट पळतो वारा
धो धो येई पाऊस टप टप पडती गारा।।धृ।।
घर,दार भिजताच रे
सारा चिखलची
खेळण्यास जाऊ कसा
बरसात गारांची
डोई,पाठी,अंगावर,
हा गारांचाच मारा
धो धो येई पाऊस
टप टप पडती गारा
।।१।।
पिलू बिचारे माऊचे,
गारठले हो भारी
खुराड्यात कोंबड्याही,
अंग चोरती सारी
इवली माझी चिऊताई
आणी कसा चारा
धो धो येई पाऊस
टप टप पडती गारा
।।२।।
कुंडीतले इवले रोप
झोडपले की रे
बदक माझे दिनवाणे
भेदरले की रे
काय करू सांग ना
हाती वितळल्या गारा
धो धो येई पाऊस
टप टप पडती गारा
।।३।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply