लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ रोजी झाला.
तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
त्यांना सु. ल. गद्रे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
अभ्यासक स्त्रिया, आकलन आणि आस्वाद, लोकनागर रंगभूमी, लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा, लोकांगण, लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा, मरणात खरोखर जग जगते, मातीची रूपे, माझिये जातीच्या, निरगाठ सुरगाठ, संस्कृतीची शोधयात्रा, स्नेहरंग, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, तिसऱ्या बिंदूच्या शोधात, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, मिथक आणि नाटक असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply