ताराबाई मोडक यांचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी मुंबई येथे झाला.
ताराबाई मोडक या माहेरच्या ताराबाई केळकर.
आपल्या भारतभूमीत बालशिक्षणाची माता म्हणवून घेण्याचा गौरव पद्मभूषण स्व.ताराबाई मोडक यांनी प्राप्त केला. १९२३ मध्ये गिजुभाई बधेका यांच्या साहाय्याने भावनगर येथे माँटेसरीच्या तत्वावर आधारलेली शिक्षणपद्धती त्यांनी निश्चित केली. मुलांच्या बालवयातच शिक्षणाचा खरा पाया घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते. यादृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक विभागात शिक्षणात नवीन पाऊल टाकले. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले.या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरु केले. यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. मराठी शिक्षणपत्रिका त्यांनीच सुरु केली.ताराबाईनी १९३३ जूनचा शिक्षणपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित केला. तत्पूर्वी त्या गुजराती शिक्षणपत्रिकेत १० वर्षे लिहित होत्या. बालकांसाठी त्यांनी विपुल लेखन लिहिले.परंतु पालक शिक्षक यांच्यासाठीही विपुल लिहिले.१९४५ मध्ये ताराबाईनी बोर्डी (जि.ठाणे) येथे ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापिले.आदिवासी मुलांच्या अडचणी लक्षात घेवून त्यांनी १९५३ मध्ये नवीन उपक्रम सुरु केला.१९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे हलविण्यात आले.येथे आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा,रात्रीची शाळा ,व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्राथमिक स्वरुपात सुरु करण्यात आले. १९६२ मध्ये त्यांना भारत सरकारने त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण हा किताब देवून गौरविले. आजही महाराष्ट्रात त्यांचे कार्य ग्राम शिक्षा केंद्र विकासवाडी,कोसबाडहिल जि.ठाणे येथे चालू आहे. ताराबाईच्या पश्चात स्व. अनुताई वाघ यांनी कार्य प्रज्वलित ठेवले.
मा.ताराबाई मोडक यांचे निधन ३१ ऑगस्ट १९७३ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply