नवीन लेखन...

टाटाचे कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण

१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.

एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.

टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.

२१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.

२३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..