प्रवेश ३ रा.
मेडिकल टेस्ट झाल्यानंतरचा दुसरा दिवस.मंदार रिपोर्ट आणण्यासाठी पुन्हा मुंबइला गेलाय.घरात दोघेच. अनंतराव पेपर वाचीत बसलेत.वत्सलाबाईंच्या हातात रिमोट.टिव्ही चालू.
अनंतराव – मला बहुतेक मस्कतला जायला मिळणार नाही असं दिसतंय.
वत्सलाबाई – .का असं का वाटतय तुम्हाला ?
अनंतराव – तसं काही नाही.तू एकटी गेलीस मस्कतला तरी मला वाइट वाटणार नाही.मला चालेल.
वत्सलाबाई – जावयाकडे जाण्याची इच्छा नाही की काय तुमची?
अनंतराव – तसं नाही गं.पण मला आपलं वाटतय खरं (तेव्हढयात मंदार येतो.त्याच्या चेहेत्रयावर निराशा.हताशपणे बसतो.आई लगबगीने त्याला पाणी आणून देते)
आई – काय रे बाळा रिपोर्टस नाही मिळाले?
मंदार – रिपोर्टस मिळाले गं. पण…….
बाबा – माझा रिपोर्ट चांगला नसेल.
मंदार.- तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला काही प्रॉब्लेम?
बाबा – काही नाही रे.काल माझ्या एक्सरेवर एक लहान काळा स्पॉट दिसला डॉक्टरांना.मी लहान असताना अंगणात झोपलो होतो त्यावेळी एक जनावर अंगावरून गेल्याचं डॉक्टरला सांगितलं.मला काहीही त्रास झाला नाही आणि होतही नाही हेही सांगितलं त्या डॉक्टरला.
मंदार – तरीच.एक्सरे समाधानकारक नाही असा रिपोर्ट दिलाय त्यांनी.
बाबा. – डोंट वरी मंदार.आइचा रिपोर्ट ओके आहेना? जाऊ दे तिला एकटीलाच. नाहीतरी प्रियाच्या बाळंतपणात माझं काय काम?
मंदार – असं कसं? आई शिवाय एकटे कसे रहाणार तुम्ही?
बाबा – अरे मी कुठे एकटा पडणार आहे? तुम्ही आहात की सगळे.दोन महिने तुझ्याकडे दोन महिने दिपुकडे.अगदीच कंटाळा आला तर ही मठी आहेच की.
मंदार – तुम्हाला एकटयाला डोंबीवलीत राहूच देणार नाही आम्ही.तरीसुध्दा…..आई शिवाय करमणारच नाही ना.शेखरशी बोलतोच मी. (मोबाइल काढून शेखरला फोन लावतो.) हॅलो शेखर..मंदार…हो…टेस्ट झाली.रिपोर्टस मिळाले. उद्याच कुरिअरने पाठवणार होतो. पण बाबांच्या रिपोर्टमधे थोडा प्रॉब्लेम झालाय….तसं काही विशेष नाही रे. एक्सरे मधे एक बारीक स्पॉट आहे. बाकी सगळं नॉर्मल…..फॅक्स करू? हो हो. आत्ता. डोंबीवलीतच आहे मी. बाहेर पडलो की लगेच फॅक्स करतो. पुण्याला निघतोच आहे आता. रात्री मेल टाकतो घरी पोहोचल्यावर.प्रिया ठीक आहे ना?…ओके देन….दोघांसाठी व्हिसा मिळेल? हो हो. आइबाबांची इच्छा आहेच. गुड नाइट.
आई – आमची दोघांची इच्छा आहे हे कशाला सांगितलंस शेखरला?
बाबा – हो ना.त्याची कितपत इच्छा आहे याचा अंदाज घ्यायचा.खरं म्हणजे मला तिकडे करमणार सुध्दा नाही.
मंदार – मी आता निघतो पुण्याला. जाता जाता तुमचे रिपोर्टस फॅक्सने पाठवून देतो शेखरला. रात्री घरी पोहोचलो की अण्णाच्या कानावर घालतो सगळं. तो काय सांगेल त्याप्रमाणे शेखरला मेल पाठवतो.
आई – उद्या रात्री आम्हालाही फोन करून कळव काय काय ठरवलंत ते.
मंदार – हो.कळवतो.बरं निघतो गं आई.
Leave a Reply