नवीन लेखन...

ताटातूट – एकांकिका

प्रवेश ४ था.

वेळ सकाळची. अनंतराव आरामखुर्चीत पेपर वाचीत बसलेत.चहाचा रिकामा कप ठेवलाय.वत्सलाबाईंच्या हातात पेपरचं एक पान आहे.

वत्सलाबाई – काय हो…तुमच्या लहानपणी अंगणात झोपले असताना तुमच्या अंगावरून जनावर गेलं होतं हे मला कसं सांगितलं नाहीत एव्हढया वर्षात ?
अनंतराव – अगं मी कधी झोपलोय लहानपणी अंगणात ?
वत्सलाबाई – मग…परवा त्या डॉक्टरला काय सांगितलत तुम्ही?
अनंतराव – अगं माझा रिपोर्ट अगदी नॉर्मल होता.डॉक्टरांनी अभिनंदन केलं माझं.तर मीच त्यांना म्हणालो की काहीतरी करून माझा रिपोर्ट खराब करा म्हणून.
वत्सलाबाई – अस्सं. म्हणून डॉक्टरने काहीतरी खुसपट काढलं तर.
अनंतराव – अगं तो वेडा झाला.रिपोर्ट कुठे खराब करायचा त्याला कळेना.तो वैतागून म्हणाला ‘तुम्हाला मस्कतला जायचं नाही तर आलात कशाला माझ्याकडे? खराब रिपोर्ट चांगला करण्यासाठी लोक मला पैसे ऑफर करतात आणि तुम्ही…..शेवटी मीच सजेस्ट केलं त्याला की एक्सरेवर एक बारीक ठिपका करा कुठेतरी छातीवर. त्याने ऐकलं माझं. नशीब पैसे नाही मागितले.
वत्सलाबाई – आपण कितीही प्रयत्न केले तरी आपला विघ्नहर्ता आपली ताटातूट होऊ देणार नाही.(तेव्हढयात फोन वाजतो.आई घाइघाइने उठून फोन कानाला लावते.)
आई – हॅलो….हं बोल राजा.व्हिसाचं काम झालं…दोघांचं? (बाबा फोन घेतात.)
बाबा – माझाही व्हिसा मिळाला? असं कसं झालं? …..नाही रे मंदार…अगदीच जायचं नाही असं नाही….शेखरनेच तिकडे काहीतरी चिरीमिरी दिली असेल. भरपूर कमवतोय ना तो….हो….आमच्यावर त्याचं प्रेम आहे हे खरंच….रॉयलवेजनेच जायचंय ना.मला ठाऊक आहे.पंधरा तारखेची ब्लॉक करू? ठीक आहे.निघतोच आत्ता बाहेर. रात्री फोन करतो….नागपूरकर मंडळीसुध्दा पोहोचवायला येणार? मग एक मिनी बस बुक करतो.अच्छा.
आई – अहो पंधरा तारीख म्हणजे येत्या गुरूवारीच की.कितीतरी गोष्टी आणायच्या आहेत मला.
बाबा – अगं हल्ली सगळया देशात सगळं मिळतं.तो आपला बळवंताचा बंडू….मस्कतवरून तर आला.भेटला
मला तो परवा. सांगत होता जानवं सहाण खोड एव्हढंच काय बिब्बा आणि सागरगोटेसुध्दा मिळताततिकडे असं म्हणाला तो.
आई – पण आपल्या बबडीसाठी डिंकाचे लाडू खसखस वडी आलेपाक वगैरे….
बाबा – आपली बबडी बाळंत झाली की मग कर डींक लाडू आळीव लाडू.पण खसखस अजिबात नको हं. खसखशीला बंदी आहे तिकडे.
आई- लिंबाचं लोणचं फार आवडतं आपल्या प्रियाला.
बाबा – लोणच्याची बरणी चेकींगच्यावेळी कस्टमवाले बाहेर काढतील. तू उगाच सामान वाढवू नको हं. आपल्याला प्रत्येकी वीस किलोपर्यत सामान नेता येइल. तुझ्या दोन्ही सुना जे देतील ते घेऊन जाऊ आपण. आपले फक्त कपडे घे.
आई – ठीक आहे.बाहेर पडताना पासपोर्टच्या कॉपी घेऊन जा म्हणजे झालं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..