या तव्यावरची भाकरी
नाही निर्लेपला ऐकायची |
कारण सरावलेल्या हातांनी
तीला सवय होती फिरायची ||१||
ठरावीक ठिकाणी दाबल्यावर
ती टच्च अशी फुगायची |
दोनच चिमटीत धरुन
अलगतशी तुटायची ||२||
तशीच जीवनाची भाकरी बाई
तीला लेपनाची गरज नाही |
कुठे फुगायचे कुठे ओसरायचे
हे तिच्यावर अवलंबून नाही ||३||
सराईत हात दिसणार नाहीत
चिमटीतून कधी सुटणार नाहीत |
त्यांच्या खोल तव्यामधून
कोणी बाहेर पडणारच नाही ||४||
Leave a Reply