टाईरोना फरनान्डो स्टेडियम हे मैदान श्रीलंकेतील मोराट्वा येथे आहे. या मैदानाचा विविध खेळांच्या सामन्यांसाठी किंवा सरावासाठी उपयोग केला जातो. परंतु सध्या तरी बहुतेक करून या मैदानावर क्रिकेटचे सामने जास्त प्रमाणात खेळविले जातात. क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम झाल्यावर या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. येथील आसन व्यवस्था ही १६,००० प्रेक्षक बसू शकतील इतकी आहे.
१९९२ मध्ये या मैदानावर पहिला क्रिकेटचा स्थानिक सामना खेळविला गेला. टाईरोना फरनान्डो स्टेडियम हे मैदान कोलंबो शहरापासून दक्षिणेकडे १३ मैलांवर आहे. या मैदानाने श्रीलंकेला अनेक दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळाडू दिलेले आहेत. टाइरोना फरनान्डो स्टेडियमचे नाव बदलण्यात आले असून तेथील डि-सोयसा या कुटुंबाचे नाव या स्टेडियमला देण्यात आलेले आहे. त्यामुळे या स्टेडियमचे सध्याचे नाव ‘डि सोयसा पार्क’ असे ठेवण्यात आलेले आहे.
डि सोयसा कुटुंबाचा हे स्टेडियम उभारण्यासाठी बराच मोठा सहभाग होता. १९४१ साली त्यांनी आपल्या मालकीची चार एकर जागा अर्बन कौन्सिलला, त्या जागी एखादे खेळाचे संकुल उभारण्यासाठी दिली होती. या मैदानाला डि सोयसा पार्क असे नाव देण्यात येऊन तेथे शालेय मुलांच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात येत असत. परंतु नंतर उपपरराष्ट्रमंत्री टाईरोना फरनान्डो यांनी १९७८ ते १९७९ च्या काळात मैदानासाठी भरपूर मदत दिल्याने ह्या मैदानाच्या जागी क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले. या मैदानावर १९९७ साली वेस्ट इंडिज संघाबरोबर सामना खेळविण्यात आला. या धावपट्टीचा विशेष म्हणजे येथे चेंडू मंद गतीने येतो. त्यामुळे हे मैदान पूर्वीपासून फलंदाजांना साह्यभूत ठरणारे मैदान आहे. ८ सप्टेंबर १९९२ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात अॅलन बॉर्डरने १०६ धावा तर इयान हेली याने ७१ धावा काढून संघाची धावसंसख्या पहिल्याच इनिंगमध्ये ३३७ धावांवर नेऊन ठेवली. परंतु अरविंद डिसिल्व्हा आणि हसन तिलकरत्ने यांनीही धावांचा डोंगर उभारून हा सामना अनिर्णित ठेवला. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेतील फलंदाजांचे हे आवडते मैदान आहे.
Leave a Reply