नवीन लेखन...

ट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………!!!

ट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………

(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)

दारू पिऊन घालीत धिंगाणा,

म्हणू लागले चियर्स,

पायाखालची जमिन हलू लागली,

आणि झाले शेकर्स……….

सापडला त्यांना गड कोणता?

नावातच आहे सुधा,

हातातील पेला तोंडाला लागताच,

हरपू लागली ह्यांची बुधा………..

हरपलेल्या बुद्धीने,

एकत्र झाले ट्रेकर्स,

सुधा तोंडी लागताच,

नियमांचे झाले ब्रेकर्स…………..

भान राहिले नाही त्यांना,

दारूच्या नशेत,

रात्रभर धिंगाणा केला,

सुधागडच्या कुशीत……………

शरमेने मान खाली घालावी,

असे होते त्यांचे कृत्य,

कसे म्हणावे महाराजांनी,

त्यांचे हे कृत्य स्तुत्य?…………

सुधागडचे बुरुज शरमले,

त्यांच्या कृत्याने सगळे वरमले,

तरीही म्हणती ह्या अफवा असती,

नव्हती त्या रात्री तेथे आमची वसती…………….

काय म्हणावे ह्या बहाद्दरांना,

आणि अकलेच्या ह्या (कांद्यांना) सरदारांना,

आपल्या ह्या कृत्याचे समर्थन करता करता,

वेड्यातच काढती हे सगळ्यांना……….

……………………………..मयुर तोंडवळकर

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..