ती आल्यावर
बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर
मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर
मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर
पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर
किती जाळले सूर्याने मज ती नसताना
नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर
मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर
ती आली अन सुचू लागली मला शायरी
पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
Leave a Reply