ती आणि तो नेहमी दिसायचे..
ठरविक वेळ,
ठरविक जागा,
बरेच महिने असे
चालले होते..
अचानक दिसेनासे झाले…
मग मी त्यांना विसरून गेलो,
आज अचानक ती दिसली…
नवरा म्हणून वेगळाच कुणी होता,
मला बघितल्यावर जरा
नजरेत गोधळ झाला…
इतक्यात तिचा नवरा
माझ्या जवळ आला..
म्हणाला किती वर्षाने भेटलास..
त्याने ओळख करून दिली…
मी नव्याने ओळख करून घेतली…
ती पार आतून हादरली असणार…
तिच्या चेहऱ्यावरून जाणवले…
मी शांत होतो..बर्याच गप्पा झाल्या..
ती होला हो,,,करत होती..
परत भेटू तो म्हणाला..
जाताना तिने ओझरता कटाक्ष टाकला..
तिच्या डोळ्यामध्ये…
आधीच्या खुणा मला स्पष्ट दिसल्या..
मी देखील हाताने तिला
ok केले..
आणि ती निर्धास्त झाली…
— सतीश चाफेकर.
Leave a Reply