ती काही क्षुल्लक धातूच्या नाण्यांसाठी अंग तोडते, मोडते. ज्या पैश्याने माणसात माणुसकी शिल्लक ठेवली नाही, त्याच खरं रूप तिच्यापेक्षा कोणाला माहीत असेल..?
रस्त्यावर सर्कस करून दाखवते, अयुष्यानं मांडलेला..!
आपण तिच्या दिशेने फेकलेला एक एक पैसा, तिच्या स्वाभिमानाचे लचके तोडत असतो. तरी ती दबल्या सुरात हसते, रानवाघीण अचानकपणे जाळ्यात अडकावी अगदी तशीच..! तिच्या गलावरचं हसू हे संबंध मानव जातीसाठी एक धडाचं असतो..? काही नाणी विखुरतात अस्ताव्यस्त, तिच्या नाशीबासारखचं..! ती वेचत असते नाण्यासोबत आपलं नशिबही..?
आपण मानव जातीच्या दांभिकतेसाठी निर्माण केलेले सर्व चोचले उपभोगून तृप्त असतो, पण ती दिवसातून हजारो शिव्या खाते. तिला पिझ्झा कसा असतो माहीत असेल का..?
ती दिवसभर आयुष्याची कसरत करून रात्री भुकेलेल्या पोटीचं झोपायला जाते. ती कुडकूडणाऱ्या अंधाऱ्या रात्री डोईजड गाठोडं माणसांनी गजबजलेल्या वस्तीत रस्त्याच्या कडेलाचं टाकून देवाने मानव जन्म का दिला असेल या विचारात उद्याची स्वप्न पाहत देह विसावते…!
भल्या पहाटेच उठते अनं चालू लागते रस्त्यावरून. क्षणभर तर समजतचं नाही रस्ते अनवाणी आहेत की तिचे पाय…?
मग त्याच अनवाणी पायाने ती मोठमोठ्या कंपनीचे शुज घातलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाला स्पर्श करते.
तेही काही मतलबी नाण्यासाठी…!
ह्या दुनियेत पैसे सोडतात किती जण..? इमान विकणारी व्यक्ती राज्य करते हे स्वाभाविकचं असतं हुशार माणसांच्या दुनियेत…! आपल्या देशात पसरणारी हवा फक्त विषारी नाही, पण माणूस…?
लाखो लोकांना पैश्याच्या बदल्यात आशीर्वाद देणारे मंदिराचे पुजारी तिला क्षणभर सुद्धा थांबू देत नाहीत. कारण तिने विचारलंच देवाला तर, ‘माझ्या नशिबी हे भोग का..?’
तीही थोडी अडखळते, बडबडते मंदिरातील दिव्या सारखीचं..! देव आपला नाही हे लक्षात येताच शांतपणे निघून जाते.
एक निरागस बालपण, ती दारिद्र्यात घालवते अनं तेही अशा समाजाच्या पायथ्याला बसून ज्यात माणुसकीची जागा चंगळवादाणे घेतलीय..!
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…!
©आज
Leave a Reply