ती – माझी छत्री
हल्ली असे होत नाही…
मी घराबाहेर पडल्यावर ती माझ्या सोबत नाही…
तिला माझ्या सोबत पाहून तो आलाच नाही…
तिला पाहताच तो कोठे दडून बसला मला माहीत नाही…
तो आल्याखेरीज तिच्या माझ्यासोबत असण्याला काही अर्थच नाही…
तो आल्याखेरीज ती ही कधी मोकळी होत नाही…
तो आल्यावर ती मोकळी झाल्याखेरीज राहात नाही…
आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने मायेचा पदर धरायला ती विसरत नाही…
तेंव्हाच मला तिची माझ्यासोबत असण्याची खरी किंमत कळल्या खेरीज राहात नाही….
तो येतो तसा जातो… त्याच्या प्रेमात ओलीचिंब झालेली ती ही मग सुकल्याखेरीज शांत होत नाही…
मी तर सुकाच असतो… तिच्यामुळे….
पावसात भिजणार्या तिच्याकडे पाहात… ती भिजून ओलीचिंब झाल्याखेरीज मी काही जागचा हळत नाही…
— कवी- निलेश बामणे ( एन.डी. )
Leave a Reply