तिचे अस्तित्व आज तीच शोधत होती
कधी काळाच्या ओघात रडत होती
युगे युगे लोटली तिच्या या लढाईला
स्त्रीचं ती प्रश्न समाजास विचारत होती
कधी गर्भात खुळल्याजात होती
ती गर्भात समाजाला नकोशी होती
तिच्या रडण्याचा आवाज नाही ऐकला कोणी
निरागस कळी ती जगणे शोधत होती
कोण करेल ग माझे स्वागत असे घर शोधत होती
अन् मिळालाच तोही आनंद एक आई तिची वाट पाहत होती
नको नको म्हणता म्हणता आलेच मी आयुष्यात
या हळव्या प्रश्नाने ती आज फारच खुश होती
चिमुकल्या पावलांनी ती अंगणात खेळत होती
मंद मंद वाऱ्यासवे फुलासमान डोलत होती
निरागस तिच्या हसण्याने हसत होते अंगणही
पण लगेच तिच्या खेळण्यावर निर्बंध लादले जात होती
पोरींची जात तू या शब्दाने ती हिनल्याजात होती
अन् परक्याच धन तिला आपलेच करीत होती
शाळेचे दिवस कसे भरकन उडून जातात
पण निरागस चेहऱ्यावरून आसवे वाहत होती
जगणे बदलते पण रित मात्र तीच होती
लवकरच ती सासरी जाणार होती
वाजले सनई चौघडे पडल्या डोई अक्षदा
नव्या आयुष्याचे ती स्वप्न पाहत होती
दिवस गेले सुखाचे पण आता ती हुंड्यासाठी जळत होती
जळता जळता त्या आसवाला हलकेच पुसत होती
आता पुरे झाले होते आयुष्य संघर्षच जगता जगता
पण माझा स्त्री असणे हा काय गुन्हा हा प्रश्न ती विचारत होती
— अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जी अकोला
Leave a Reply