रोजचा दिवस काहीतरी शिकवून जातोच. असंच कालच्या दिवशी मला इंग्रजी TEENAGER या शब्दाचा उगम कळला व कालचा अवघा दिवस सार्थकी लागला..
साधारणत: वय वर्ष १२ ते २० वयापर्यंतच्या मुला/मुलींना TEENAGER म्हणतात हे सवयीने ऐकून माहीत होतं, पण का म्हणतात हा विचारच कधी मनात आला नव्हता. कालचा दिवस संपता संपता ध्यानी मनी नसता हा शब्द अचानक उलगडला आणि माझा कालचा दिवस सोन्याचा करून गेला..
आता हा शब्द का आला ते सांगतो. अगदी साघी गोष्टं आहे, बारा ते एकोणीस या वयाच्या आकड्यांच्या इंग्रजी स्पेलिंगमुळे हा शब्द अवतरला.. ThirTEEN, FourTEEN ते NineTEEN या स्पेलिंगमधिल शेवटच्या ‘TEEN’ मुळे या वयाच्या
मुलांना TEENAGER असं म्हणतात..!
-नितीन साळुंखे
Leave a Reply