कधी नव्हे ती अनेक वर्षाने भेटली…
मी तिला ओळखलेच नाही परंतु तिने मात्र मला ओळखले.
जेव्हा तिने ओळख दाखवली तेव्हा मी चकितच झाली.
ही का ती ?
मनात पहिला प्रश्न आला , परंतु मी चेहऱ्यावर काही दिसू दिले नाही.
खरे तर चेहऱ्यापेक्षा माणसाचे डोळे तुम्हाला उघडे पाडतात .
परंतु माझ्या डोळयांवर गॉगल होता..
या गॉगलचा फायदा बरेच ‘ अंगाने ‘ मला होत असतो.
ह्याचा प्रत्यय मला आजही आला.
खरे तर मला फुरसत होती , म्हणालो चल
समोरच्या हॉटेलमध्ये बसून गप्पा मारू.
तिने घड्याळ बघीतले ..
म्हणाली वेळ आहे मला..जरा खाऊ देखील …
ऑर्डर दिली आणि गप्पा सुरु झाल्या,
त्याच त्या जुन्या आठवणीना उजाळा मिळत होता.
आणि पटकन गाडी वेगळ्याच विषयावर सरकली..
अरे तुझे त्याच मुलाशी लग्न झाले ना…
तो लास्ट इअरला होता त्याच्याशी..
यावेळी मी ‘ लास्ट ‘ या शब्दावर जरा जास्त जोर मी मारला.
तशी ती हसली , म्हणाली नाही रे तो तर पुढे दुसऱ्या गावी निघून गेला.
मी परत त्याचा विषय काढला नाही , कारण ती जे ज्या स्वरात म्हणाली
त्यावरून समजले.
चल जाऊ दे , तिने मला विचारले तू काय करतोस…
मी आपले सांगितले नेहमीप्रमाणे.
एकंदरीत मला तिच्या बद्दल जास्त जाणून घ्यायचे होते.
कारण एक मात्र खरे तर मी पण तिच्या ‘ लिस्ट ‘ मध्ये होतो.
आणि माझ्या ‘ लिस्ट ‘ मध्ये ती.
परंतु असे काही बोलणे , फिरणे झाले नाही.
ते तसेच राहिले कारण खरे तर तिच्या मागे बरेच होते.
अर्थात तिला खूप ‘ चॉईस ‘ होता.
तसा प्रत्येकाला या बाबतीत खूप ‘ चॉईस ‘ असतो
परंतु त्यावेळी
त्याला त्याचे भान नसते.
आमचेही तसेच.
म्हणून आयुष्य काही थांबत नाही..
ती म्हणाली लग्न म्हणजे अडगळ वाटत्ते रे..
इतक्या वर्षाने कळले तुला…मी म्हणालो.
नाही प्रत्येकाला ती वाटत असते पण कोणी बोलून दाखवत नाही.
बोलता बोलता ती म्हणाली मी इथेच राह्यला आली आहे,
पर्समधून सिगरेट काढून म्हणाली .
तू पितोस का…
मी हो म्हणाली …
मग ‘ धुरच धूर ‘
ग्रेट सर्व काही व्यवस्थित आहे..पण हा असा व्यस्थितपणा खूप आळणी वाटतो.
आता तिची गाडी खऱ्या विषयावर आली .
कारण ही स्टेप प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते
आम्ही ठरवले एकमेकांना भेटायचे ,
फोन नंबरांची अदलाबदल केली.
त्यानंतर बरेच वेळा भेटलो , एकमेकांच्या सोयीने .
एक वेगळेच तिसरे विश्व निर्माण होत होते.
ह्या विश्वात खरी मजा असते राव….
कोणीही कितीही नाव ठेवो.. कारण हे विश्व
‘ शरीरापलीकडे आणि मनाच्या अल्याड ‘ असते.
मग परत ‘ मिटिंग ‘ पॉईंट ठरवणे.
मग तीच ‘ चोरी ‘
तीच धाकधूक ,
कुणी बघेल का ?
सगळेच कसे …
आता मात्र खूप सोपे आहे चॅटींग , विडिओ कॉल वगैरे म्हणून बरे
पुन्हा एकदा ‘ बँक टू पॅव्हेलियन …..’
सतीश चाफेकर
Leave a Reply