नवीन लेखन...

टेफ्लॉन

पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील तवा किंवा कढया एकतर लोखंडी, पितळी वगैरे धातूंच्या असायच्या पण आता हे जुने तवे किंवा कढयांची जागा अतिशय आधुनिक अशा नॉनस्टिक तवे व फ्राइंग पॅन्सनी घेतली आहे. लोखंडी किंवा इतर धातूंच्या कढया किंवा तव्यांना अन्नपदार्थ चिकटून ते जळतात, असा अनुभव होता.

त्यावर इलाज म्हणून ही नॉनस्टिक कुकवेअर्स अस्तित्वात आली. या नॉनस्टिक भांड्यांना वरच्या भागावर जो एक थर दिलेला असतो त्याला टेफ्लॉन म्हणतात. या टेफ्लॉनमुळेच अन्नपदार्थ तव्यास चिकट नाहीत तसेच जळत नाहीत. परंतु कालांतराने हा थर नाहीसा झाला की, नॉनस्टिक कुकवेअर भांडी कामाची राहत नाहीत.

नॉनस्टिक कुकवेअर्स जरी अलीकडच्या काळातली असली तरी या टेफ्लॉनचा शोध १९३८ मध्ये न्यूजर्सीतील कायनेटिक केमिकल्समध्ये काम करणारे रॉय प्लंकेट यांनी लावलेला होता. प्लंकेट हे नवीन सीएफसी प्रशीतक पदार्थ तयार करीत असताना अनपेक्षितपणे ज्या रसायनाचा शोध लागला ते रसायन म्हणजे पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीन (पीटीएफइ) होय, त्यालाच ड्युपाँटच्या टेफ्लॉन उत्पादनावरून पुढे टेफ्लॉन हेच नाव पडले. रसायनशास्त्राच्या दृष्टीने ते टेट्राफ्लुरोइथिलिनचे कृत्रिम फ्लुरोपॉलिमर असते.

पीटीएफइ म्हणजे टेफ्लॉन हे फ्लुरोकार्बनचे रूप मानले जाते व त्याचे रैणवीय वजन जास्त असते, त्यात कार्बन व फ्लोरीन हे मुख्य घटक असतात. कुठल्याही घर्षणाला पुरून उरण्याची क्षमता त्यात असते. नॉनस्टिक भांड्यांमध्ये या पीटीएफइचा वापर करण्याचे कारण म्हणजे त्यातील कार्बन-फ्लोरिनचे घटक हे अतिशय शक्तिशाली असतात. त्याचबरोबर त्याचा वितलन बिंदू सर्वाधिक म्हणजे ३२७ अंश सेल्सियस असतो. जिथे पाईप गंजण्याचा धोका असतो अशा ठिकाणीही त्याचे आवरण दिलेले असते.

१९५४ मध्ये फ्रेंच अभियंता मार्क ग्रेगरॉयर यांनी त्यांच्या पत्नीच्या आग्रहास्तव टेफ्लॉन नॉनस्टिक रेझीन वापरून टेफाल हे पहिले नॉनस्टिक पॅन तयार केले. त्यानंतर १९६१ मध्ये अमेरिकेत मॅरियन ए. ट्रोझोलो यांनी याच पदार्थाचा वापर करून फ्राइंग पॅन तयार केले, त्याला त्यावेळी द हॅपी पॅन असे म्हटले गेले.

टेफ्लॉन म्हणजेच पीटीएफइ हे थर्मोप्लास्टिक पॉलिमर असते व कक्ष तापमानाला तो पांढऱ्या रंगाचा घनपदार्थ असतो. टेफ्लॉनचा शोध हा अमेरिकी अंतराळ कार्यक्रमामुळे लागला असे म्हणतात ते मात्र खरे नाही, कारण रशियाचा युरी गागारिन अंतराळात जाण्यापूर्वीच अशी नॉनस्टिक भांडी तयार होती. टेफ्लॉनचा थर २६० अंश तापमानाला खराब होण्यास सुरूवात होते पण आपण शिजवतो त्या अन्नपदार्थांना एवढ्या उष्णतेची गरज नसते. टेफ्लॉनच्या भांड्यांमुळे कर्करोग होतो व शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते असे संशोधनाचे निष्कर्ष आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..