नवीन लेखन...

तेजस्वी – तेजस्वी पाटील

तेजस्वी पाटील… नावाप्रमाणेच तेजस्वी चेहरा… तरल भावछटा अभिनेत्रीबरोबरच ती अभ्यासू कलाकार आहे….
भगवानदादा यांच्या आयुष्यावर चितारलेला ’एक अलबेला’ हा सिनेमा मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी एक माईलस्टोन ठरला. सिनेमात भगवानदादांच्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई झळकला. तर याच सिनेमात लक्षवेधी भूमिका ठरली ती भगवानदादांच्या पत्नीची. एरवी मॉडर्न गर्ल म्हणून मराठी इंडस्ट्रीत वावरणारी तेजस्वी पाटील हि चक्क सोज्वळ, घरंदाज, साध्या वेषात भगवानदादांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आपल्या कसदार अभिनयानं तेजस्वीनं या वेगळ्या भूमिकेचं सोन केलं.

लग्नानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या काही मोजक्या यशस्वी कलावती आहेत. तेजस्वी पाटील ही यापैकी एक. स्वदीप पाटील या व्यावसायिक तरुणाशी तेजस्वीचं लग्न झालं आणि लग्नानंतर व्यवसयिक कलाकार म्हणून तेजस्वीने ओळख निर्माण करावी अशी स्वदीपची इच्छा होती. तेजस्वीचं कलाकार होण्याचं स्वप्न स्वदीपच्या मदतशीर स्वभावामुळेच शक्य झाल्याचं तेजस्वी सांगते. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली मी आणि तेजस्वी फोटोशूटसाठी तिच्या अंधेरीच्या घरी भेटलो होतो. त्यावेळी ती सांगत होती. यावेळी तेजस्वीचा एमबीएपर्यंतचं शिक्षण तर यापुढे एचआरमध्ये तिने केलेलं स्पेशलायझेशन या सगळ्यावर आम्ही गप्पा मारत होतो. सणानिमित्ताने तेजस्वीचं फोटोशूट आम्ही करत होतो. हे करताकरता तेजस्वी तिच्या आवडीनिवडी, तिचा सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आणि त्यातल्या गमतीजमाती सांगत होती. या गप्पांमुळे तेजस्वी रिलॅक्स झाली होती. तिच्यावर शूटचं टेन्शन अजिबात जाणवत नव्हतं आणि म्हणूनच शूटच्या दरम्यान बोलक्या तेजस्वीचे हसरे, प्रसन्न फोटो मला टिपता आले.

२०१३-१४ साली तेजस्वी ’प्राजक्ता’ या तिच्या ’मी मराठी’ चॅनलवरील प्रमुख भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तर यानंतर झी टीव्हीवरील ’भाग्यविधाता’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. यानंतरचा तेजस्वीचा प्रवास मला आमच्यातल्या संभाषणामुळे वेळोवेळी समजत होता. २०१३ साली पुन्हा आम्ही एका शूटच्या निमित्ताने एकत्र काम केलं. मराठी सणवार बेतलेलं हे शूट होतं. हा मराठमोळा साज लक्षात घेऊन तेजस्वीचा लूक काय असेल यावर माझी टीम काम करत होती. सगळ्यात आधी तिचा लूक ठरला. त्यानंतर कॉस्च्युम मग मेकअप आणि हेअर आणि सगळ्यात शेवटी त्यावरचे दागिने आणि इतर बाबी ठरवण्यात आल्या. या लूकला तेजस्वीचीही पसंती मिळाली आणि शूटचा दिवस ठरला.

नेहमीच ठरलेला मराठमोळा लूक न निवडता यावेळी तेजस्वीसाठी मॉडर्न लूक निवडण्यात आला होता. या मॉडर्न लूकमध्ये तेजस्वीचा चेहरा अधिक खुलून दिसत होता. तेजस्वीचं स्मितहास्य, डोळ्यांतली चमक आणि प्रसन्न चेहऱयामुळे हे शूट यशस्वीपणे पार पडलं. याच शूटनंतर तेजस्वीचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये एक फोटोशूट करण्यात आलं. शॉर्ट वन पीसमध्ये तेजस्वीचं ग्लॅमर शूट करण्यात आलं. यावेळी तेजस्वीच्या चेहऱयावर थोडीशी भीती दिसत होती. एरवी मॉडर्न कपडय़ांत सहज वावरणारी तेजस्वी यावेळी थोडी शांत शांत दिसली. आम्ही काही फोटो काढले; परंतु हवे तसे फोटो मिळत नव्हते. थोडावेळ थांबून तेजस्वीशी बोलून मग पुन्हा हे फोटोशूट करण्यात आलं. तेजस्वी आता थोडी खुललेली दिसली आणि मग बिनधास्त तेजस्वीचे हटके फोटो मला यावेळी टिपता आले.

या शूटनंतर पुन्हा मला तेजस्वीचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक फोटोशूटची संधी जितकी हवीहवीशी वाटते तितकीच त्याची जबाबदारीही जास्त असते. शूटचा दिवस ठरला आम्ही स्टुडिओ १०९ मध्ये भेटलो. तेजस्वीच्या शूटच्या आधी ‘झाला भोबाटा’ या गाजलेल्या मराठी सिनेमातील मोनालिसा बागलाच फोटोशूट मला करायचं होत. हे शूट थोडं लांबलं आणि तेजस्वीच्या शूटला आम्हाला उशीर झाला. तेजस्वी मेकअप रूममध्ये शांत बसली होती. एखाद्या कलाकाराचं शूट ठरलेल्या वेळेत सुरू व्हावं म्हणून माझी टीम शूटच्या किमान तासभर आधी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असते आणि शूट वेळेतच सुरू झालं पाहिजे असा माझा नेहमीच आग्रह असतो; परंतु त्यादिवशी तेजस्वीच्या शूटला उशीर झाला. तेजस्वीने नेहमीप्रमाणेच त्यादिवशीही शूटसाठी मदतशीर होती. साधारणपणे अर्धा तास हे शूट उशिरा सुरू झालं. स्टुडिओत तेजस्वीचं शूट सुरू झालं आणि तिच्या चेहऱयावर एक वेगळंच तेज यावेळी मला पाहायला मिळालं. संयमी स्वभावाच्या तेजस्वीचं हेच रहस्य तिच्या सिनेमातल्या कामातही बघायला मिळतं. उगीच मिळतील ते सिनेमे, वरवरची कामं तेजस्वी टाळते. संयमानं चांगल्या कामाची वाट बघते आणि मिळालेल्या संधीच ‘सोनं’ करण्यासाठी अपार मेहनत घ्यायची तयारी दाखवते हेच तेजस्वीच्या यशाचं गमक असावं.

धनेश पाटील
dhanuimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..