तेजोनिधीचे आगमन होते, सोनसळी सगळे भूतल, रंग पाण्यावरती बिखरतें,
फक्त मोजावे ते निव्वळ,–!!!
आभाळात, दशदिशांत,
ते कोठून सगळेच येतात,
सूर्योदयाची संधी साधत,
चहुदिशी कसे पसरतात,–!!!
कुठला रंग नसतो बघावे,–?
तांबडा, निळा, हिरवा, पिवळा, नैसर्गिक रंगांचे मेळ जमले,
अखंड संगत ना, सूर्यदेवा ,–?!!!
जशी किरणांची जादू फैलावे, बदल साऱ्या चराचरांत,
उजेडाची भक्कम पकड येते, धरणीला घेत आवाक्यात,–!!!
जांभळे, निळे, तांबडे, पिवळे,
रंग मावेनात आकाशात
नभ पहा ओसंडून वाहते, पृथ्वीवरती कसे झोकात,–!!!
तपकिरी, राखाडी, काळे, निळे फलक सगळे विस्तारत जात, रंगांचे फिरवत मग कुंचले, दिनकराच्या दिव्य दरबारात,–!!!
डोळ्यांचे फेडत पारणे,
मित्रराज येई गगनात,
रंगीबेरंगी चित्र देखणे,
धरेच्या विशाल प्रांगणात,–!!!
प्रतिबिंब निळ्या पाण्यात पडे, सोनेरी किरणांचा धुडगूस,
उन्हे कोवळी, खेळती बाळे, काळ्याआईच्या अंगोपांगात,–!!!
सोनेरी पिवळट ऊन साजिरे, निळ्या पाण्यात जाई आरपार, तेथवर जाऊन दर्शन घेते,
सूर्यबिंबाचे पुन्हा एकवार,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply