ताडोबा जंगल चंद्रपूर पासून ४० किमी तर नागपूर पासून १६० किमी अंतरावर. वाघाकरिता प्रसिद्ध. त्या जंगलातील पाणथळी व तलाव ह्या प्राणी बघण्याच्या हमखास जागा आहेत.
जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ, नितळ व निस्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र निळे आकाश. दहा मिनिटे निस्सिम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता. ध्यान समाधीचा अनुभव वाटत होता. एका पक्षाच्या शिटी सारख्या आवाजाने शांतता भंग पावली होती. हळूहळू ५ हरणांचा कळप तलावाच्या काठावर आला.त्यां चे कान व डोळे वाघाच्या चाहुलीकडे लागलेले, पण भराभर पाणी पीत होते. हळूहळू एकेक पाडस काठाजवळ येत होते.मधेच पाण्याला तोंड लावत,क्षणात झाडाआड लपत. ओल्या मातीत वाघाच्या पायाचे ताजे ठसे दिसत होते, वाघाच्या दर्शना पेक्षा तलावाच्या वातावरणाने मिळालेला आनंद लाख मोलाचा होता.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply