मंडळी सप्रेम नमस्कार !
सध्या सोनी चॅनलवर हिंदी इंडियन आयडाॅल सुरु आहे.याचा उच्चार उच्चभ्रू (स्वत:ला समजणारे !) लोक आयडल ( म्हणजे निष्क्रिय! ) असा का करतात हे एक न सुटणारे कोडे ! असो…..
यात मेनुका पौडल नावाची एक अत्यंत सुरेल आवाजाची गायिका आहे.स्व.नूतनजी यांचे देखणे चिरंजीव मोहनीश बहल यांच्या उपस्थितीत मेनुकाने १९७३ चा सौदागर या चित्रपटातील स्व.रविंद्र जैन यांनी लिहिलेले आणि संगीतबद्धही केलेले तेरा मेरा साथ रहे हे गीत अतिशय सुरेल पद्धतीने सादर केले.या निमित्ताने हा लेखप्रपंच….. तुम्हाला आठवत असेल तर मराठी इंडियन आयडाॅल सुरु असताना परीक्षक अजय—अतुल होते आणि त्यावेळी मी अजय—अतुल यांच्या परिक्षणाचे कौतुक करणारा लेख लिहिला होता.
सध्या या हिंदी इंडियन आयडाॅल मधे परीक्षक म्हणून प्रथितयश संगीतकार विशाल दादलानी—गायिका श्रेया घोषाल व गायक कुमार सानू आहेत. मनाला अतिशय खटकणारी गोष्ट म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात अतीरेक वाटावा अशा इतर कृतींसोबतच श्रेया घोषाल व कुमार सानू यांची अखंड बडबड सुरू असते.एखाद्या कलाकाराचं गाणं सुरु असतानाही पार्श्वसंगीताप्रमाणे अखंड टाळ्या , श्रेया—कुमार यांचे वाहवा वगैरे दाद देणे सुरुच असते.संगीत कार्यक्रमात इतका वात आणणारा दुसरा कार्यक्रम माझ्या पहाण्यात वा ऐकण्यात नाही ! आता जरा या गाण्याविषयी…… गाणं सुरेल म्हटलं मेनुकाने , पण सुरुवातीला ध्रुवपदातील शब्द विसरली.मूळ गाण्याची लय आणखीन संथ केली व गायली.तरीही गायली सुरेख यात वाद नाही , पण हे सर्व असूनही ये गाना हिट से ज़्ज़्यादा लिट है ?
मराठीतील सा रे ग म प च्या वेळी मा.देवकी पंडित परीक्षक होत्या त्यावेळचं परिक्षण आठवतं , शब्दांना , गायकीला , भाव प्रदर्शनाला किती अचूक महत्व दिलं जायचं !याउलट या हिंदी कार्यक्रमात बाॅलीवूड दे मार मसाला छाप कार्यक्रम करून प्रचंड दिखावा केला जातोय , नि:शब्द नीरव शांततेत एकही गाणं ऐकायला मिळत नाही ! निवडलेल्या गायक विद्यार्थ्यांमधे बंगाली वर्चस्व….. अश्या अनेक गोष्टी मला जाणवल्या….. श्रेया व कुमार यांचं प्रमाणापेक्षा जास्त बोलणं व प्रदर्शन…..
असो…..
आता या तेरा मेरा साथ रहे पाशी येतो….. १९७३ च्या सौदागर चित्रपटातील मोती हा गूळ बनवणारा व्यापारी आपल्या फायद्यासाठी वयस्कर विधवा महजबी हिच्याशी निकाह करतो व मेहरचे ५०० ₹ साठल्यावर तिला तलाक़ देऊन फूलबानो शी निकाह करतो….. फूलबानोशी प्रेमाचे चाळे करून आल्यावर महजबीच्या घरापाशी मोती येतो तेंव्हा ती हे गाणं म्हणत असते. स्व.रविंद्र जैन या प्रतिभावंताविषयी म्या पामराने काय बोलावं ? यांचं संगीत इतकं प्रवाही व नैसर्गीक असायचं की कधी संपूच नये असं वाटायचं…..
( पटत नसेल माझं म्हणणं तर याच चित्रपटातील सजना है मुझे हे आशाचं गाणं ऐका…. ) तर मंडळी , चित्रपटातील कथानकाला अनुसरून चित्रपटातील नायिका महजबी ( नूतन ) ला मोतीचं स्वार्थी वागणं लक्षात आल्यावर काय वाटलं असावं ?— याची कल्पना करून मी एक कडवं शेवटचं लिहिलं आहे , गाण्याच्याच लयीत व चालीत बसवण्याचा प्रयत्न केलाय.
मूळ ३ कडवी आहेत.मी लिहिलेलं चौथं व शेवटचं कडवं ठळक अक्षरात लिहिलंय….. गाऊन,गुगगुणून बघा कसं वाटतंय ( फक्त ते दु:खी असल्याने शेवट दु:खी स्वरात संथ आवाजात म्हणून पहा : तेरा मेरा साथ रहे…..
तेरा मेरा साथ रहे हो
तेरा मेरा साथ रहे
धूप हो, छाया हो, दिन हो कि रात रहे
तेरा मेरा …
दर्दकी शाम हो या, सुख का सवेरा हो
सब गँवारा है मुझे, (साथ बस तेरा हो) -३
जीते जी मर के भी, हाथ में हाथ रहे
तेरा मेरा …
कोई वादा ना करें, कभी खाये न क़सम,
जब कहें बस ये कहें, (मिल के बिछडेंगे न हम) -३
सब के होंठों पे, अपनी ही बात रहे
तेरा मेरा …
बीच हम दोनो के, कोई दीवार न हो
तू कभी मेरे ख़ुदा, (मुझसे बेज़ार न हो) -३
प्यार की प्रीत की यूँ ही बरसात रहे
तेरा मेरा …
ज़िंदगी बिन तेरे , अब मेरी वीराँ है
मौतभी आती नहीं (वो भी ख़ुद हैराँ है)—३
डोली ले आए जो….. अर्थीमें भी हाथ रहे
तेरा मेरा साथ रहे
कळावे ,
आपला विनम्र
-उदय गंगाधर सप्रे — ठाणे
रविवार — ४ फेब्रुवारी २०२४—स.८.००)
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक उदय गंगाधर सप्रे ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply