अनिल बर्वे यांनी थँक यू मिस्टर ग्लाड हे नाटक या त्यांच्या कादंबरीवर लिहिले. मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनने हे नाटक १९७७ साली प्रकशित केले. या नाटकाचा पहिला प्रयोग दि. २४ ऑक्टोबर १९७६ साली मुबंई येथे झाला. या नाटकात बाळ धुरी, प्रभाकर पणशीकर या नावाजलेल्या नटांनी कामे केली होती. नंतरच्या काळात यशवंत दत्त व मोहन जोशी यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी ‘थँक यू मिस्टर ग्लाड ‘ हे नाटक गाजले. आजही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही.
अँग्लो-इंडियन जेलर मिस्टर ग्लाड आणि नक्षलवादी डॉक्टर बीरभूषण पटनाईक ह्या दोन असामान्य व्यक्तिरेखा निर्माण करून त्यांचा जबरदस्त सामना रेखाटावा तर अनिल बर्वे यांनीच.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply