हे वाचाल तर हसून हसून वेडे व्हाल….
यॉर्कशायरमधल्या एका माणसाने बर्मिंगहॅममधल्या मित्राला लिहिलेले पत्र…
“माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये गेले बरेच दिवस चोर्या होत होत्या. मी यामुळे अगदी वैतागून गेलो होतो. परिसरात ऑटोमॅटिक अलार्म सिस्टिमची व्यवस्था होती पण तिचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा मी माझ्या घरातली अलार्म सिस्टिम तोडून टाकली आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतून बाहेर पडलो.
मी एक वेगळी शक्कल लढवली. मी माझ्या घरासमोरच्या बागेत चार कोपर्यात पाकिस्तानचे झेंडे लावले. बरोबर मध्ये “इसिस”चा मोठा झेंडा लावला.
आता मला कसलीच अडचण नाही. यॉर्कशायर पोलिस दल, राष्ट्रीय सुरक्षा पथके, स्कॅटलंड यार्ड, MI-5, MI-6, सीआयए आणि युरोपमधल्या जवळपास सगळ्याच सुरक्षा यंत्रणा आता माझ्या घरावर २४ तास पाळत ठेऊन असतात.
माझ्या मुलांवर शाळेत जाता-येताना पाळत ठेवली जाते. माझ्या बायकोवर बाजारात जाता-येताना पाळत ठेवली जाते. मी कामावर जाता-येताना माझ्यावरही सतत पाळत ठेवल जाते.
इतकी सगळी सिक्युरिटी असताना कुणी चोर माझ्या किंवा माझ्या घराच्या वाटेला कशाला जाईल.. आहे की नाही भन्नाट आयडिया ?
ही आयडिया सुचण्यासाठी पाकिस्तानचे लाख लाख आभार !!”
(व्हॉटसअॅप फॉरवर्ड)
Leave a Reply