‘पूर्णांक’ या नाट्यसंस्थेची स्थापना 1976 साली झाली. तेव्हा या संस्थेचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर, तर कार्यवाहक डॉ. माधव देव होते. श्रीकांत आपटे, सुरेंद्र चौधरी, संजय देव, अनंत भागवत, माधुरी भागवत, पेंढारकर, डॉ. देवस्थळी, हृदय चंदन यांनी या संस्थेच्या माध्यमातून ठाण्याच्या नाट्यपरंपरेत भर घातली. ‘पूर्णांक’ने आपल्या नाट्यप्रवासात ‘भक्ष्य’, ‘प्रेक्षकांनी क्षमा करावी’, ‘राक्षस’, ‘म्हातारबाबा कुठे चाललात?’, ‘यू बी द जज’ या एकांकिका आणि ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके सादर केली.
साभार: ठाणे रंगयात्रा २०१६ मासिक.
Leave a Reply