ठावूक होतं ठरलेलं कधी होत नाही,
म्हणूनच ठरवलं नव्हतं काही काही ।
नव्हते मनीं माझ्या, तसेंच नव्हते ध्यानींही,
पिंडच नव्हता ठरविण्याचा कधी काही ।।
केव्हांच गेला सांगून पार्थ सारथी सर्वकाही,
करावी सदा मनोभांवे सत्याचीच कार्यवाही ।
ठरविण्याची काही, नव्हती म्हणून मजसि घाई,
कृतीशीलतेतुनि साथीस होती त्याचीच परछाई ।।ठेवूनि निष्ठा तयांवरी, सदैव मग्न मी कार्यीं,
राहिलो तृप्त भावनेने, दिले तयाने सर्व काही ।
नामांतुनि तयाच्या मिळण्याची, येथे आहे ग्वाही,
चित्तीं वसतां तो, मिळायचे उरलेच नाही काही ।।

आणि मग सारं, सगळं पटतं अपुल्या मनालाही,
नसते हुरहुर अन् घोर या जिवालाही ।
ठरविण्याची काही, कधी आलीच नाही पाळी,
नव्हती स्मृतींतही अक्षरे ठरवलं होतं खूप काही ।।
-गुरुदास / सुरेश नाईक
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply