सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
सूर्यकिरण पसरले अंबरी ।।
उदर भरण करण्यासाठी
लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।
कावळे, घारी, साळुंखी ही
पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।
प्रत्येकाचा सूर निराळा
गाऊन सवंगड्या साद घालती ।।
पटकन आला थवा राव्यांचा
मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।
घाणेरीच्या झुडुपांमध्ये
क्षणात हा थवा मिसळून गेला ।।
मोबाईल हा गप्प बसेना
मग नजारा हा राव्यांचा ।।
छायाचित्रण करुनी तयांचा
आनंदाचा क्षण साठविला ।।
(रावा =पोपट)
— मी सदाफुली
संध्या प्रकाश बापट
03/10/2019
Leave a Reply