लेखक द. पां. खांबेटे यांचा जन्म ५ जुलै १९१२ रोजी झाला.
दत्तात्रय पांडुरंग खांबेटे यांचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या अधिकृत नावाबरोबरच ग्रंथकीटक, मंडण मिश्र, दत्ता मराठे, निसर्गप्रेमी, चंद्रहास, संतदास, मुरारी वेंगुर्लेकर, सोमाजी गोमाजी कापशे, प्रज्ञानंद, नारबा भोळे, ज. न. ताभोळी, के. दत्त, अवधूत आंजर्लेकर, गोष्टीवेल्हाळ, वि. म. ब्रह्मे, अविनीत, श्यामकांत सामंत, दत्तूकाका, पुरुषोत्तम मराठे अशी विविध नावं वापरून विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलं. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक, विनोदी, मानसशास्त्रीय, उपहासात्मक, विडंबनात्मक लेखनासोबतच त्यांनी भयकथाही लिहिल्या.
उपहास, माझे नाव रमाकांत वालावलकर, नवऱ्याचे संगोपन, प्रेमाची देणीघेणी, मोठ्या माणसांच्या गमतीदार गोष्टी, पन्नास वर्षांत मुंबई समुद्रात बुडेल, स्वयंसूचना, आटपा रे आटपा लवकर, पोटिमा (पोटावर टिचकी मारा), हसत खेळत मनाची ओळख अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ‘हसत खेळत मनाची ओळख’ या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातून त्यांनी खरोखरच हसतखेळत, सहज गप्पा माराव्यात तसं विनोदी ढंगानं, वाचकांना मनाचं विश्व, मनाचे विकार आणि त्यावरचे सोपे उपाय उलगडून दाखविले आहेत.
द. पां. खांबेटे यांचे निधन ६ ऑगस्ट १९८३ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
How many books written by Marathi writer d p khambete are available for sale
Where can I get books written by d p khambete