ओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली.
त्यांनी पुण्याला फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया मध्ये शिक्षण घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी अल्काझीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे अभिनयाचे शिक्षण घेतले तेव्हा तेथे नसरुद्दिन शहा त्यांच्या बरोबरचा विद्यार्थी होता.
त्यांनी प्रथम ‘ घाशीराम कोतवाल ‘ ह्या चित्रपटात भूमिका केली. त्यानंतर भूमिका , अरविंद देसाई की अजब दास्तान हे चित्रपट आले १९८० साली तीन चित्रपट आले अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है , आक्रोश आणि भवनी भवाई ह्या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. १९८३ साली आलेल्या अर्धसत्य या चित्रपटाने मात्र त्यांच्याबाबतीत खऱ्या अर्थाने चित्रपट क्षेत्रात क्रांतीच झाली असे म्हणावे लागेल. त्यांनी खूप समांतर चित्रपट केले. पुढे त्यांनी त्यांनी सुमारे तीनशेच्यावर चित्रपटातून कामे केली. त्यात जाने भी दो यारो , चूप चूप के ,अग्नीपथ , लंडन ड्रीम्स , चक्रव्यूव्ह , चाची ४२० अशा अनेक चित्रपटांची नावे देता येतील. त्याचप्रमाणे त्यांनी हॉलिवूडच्या काही चित्रपटात देखील कामे केली. सिटी ऑफ जॉय , द घोस्ट अँड डार्कनेस ,सच ए लॉंग जर्नी , इस्ट इज इस्ट , द हंड्रेड फूट जर्नी अशा हॉलिवूड चित्रपटातूनह भूमिका केल्या. त्यांनी कन्नड , मराठी, मल्याळम , पंजाबी , तेलगू , भाषेच्या चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांनी ब्रिटिश चित्रपटातूनही कामे केली. काही वर्षांपूर्वी ओम पुरी आणि दिव्या दत्ता यांनी सादर केलेला ‘ तुम्हारी अमृता ‘ बघण्याचा योग्य आला होता. ओम पुरी यांचा आवाज आजही कानात घुमतो आहे. प्रचंड स्पष्टवक्तेपणा त्यांच्यात होता म्ह्णून त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले , काही वादही निर्माण झाले. , आयुष्यात वादळेही आली. त्यांना भारत सरकारने १९९० साली पदमश्री देऊन त्यांचा देऊन गौरव केला. त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकारने ‘ ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एपायर ‘ देऊन सन्मान केला.
अशा या चतुरस्त्र अभिनेत्याचे ६ जानेवारी २०१७ रोजी अंधेरी येथील त्याच्या निवास्थानी निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply